Home मुंबई राज्यातील पञकारांन संदर्भात खोडसाळपणाच्या खोट्या संदेशावर कारवाई करण्याबाबद प्रकाश जावडेकरांना निवेदन….!

राज्यातील पञकारांन संदर्भात खोडसाळपणाच्या खोट्या संदेशावर कारवाई करण्याबाबद प्रकाश जावडेकरांना निवेदन….!

417

अमीन शहा

मुंबई , दि. २१ :- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सोशल मीडियावर म्हणजे व्हॉट्सअप व फेसबुक सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या नावाने खोडसाळ संदेश तयार करुन तो मोठ्या प्रमाणात सर्वञ व्हायरल होत आहे . राज्यातील पत्रकारांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याच्या अफवा या संदेशाच्या माध्यमातून पसरविल्या जात आहेत .
हे लोक आपल्या फोटोचा गैरवापर करीत आहेत . तसेच मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशात डिजिटल इंडिया अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असून याच डिजिटल इंडियाची प्रेरणा घेवून जिल्हा पातळीवर अनेक पत्रकारांनी स्वतःचे वेब न्यूज पोर्टल तयार केलेली आहे .
कोरोनाच्या कार्यकाळात राज्यातील अनेक पञकारांची नौकरी व मोठ – मोठ्या वृत्तपञांच्या संपादकांनी पञकारांना नौकरीवरून काढल्यामुळे अनेक जेष्ठ व अभ्यासु पञकारांनी गुंतवणूक करून डिजिटल मीडिया वेबसाईट सुरू केल्या आहेत . राज्य व केंद्र शासनाच्या शासकीय योजना व अन्य माहिती तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे . डिजिटल इंडियाचे फायदे व तोटे सर्व नागरिकांना माहिती असून ग्रामीण भागामध्ये डिजिटल मीडियाचे पत्रकारांबाबत लोकांमध्ये सन्माननीय भावना आहेत . चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे , राजकीय पक्षांचा अजेंडा चालविणे , पत्रकारितेच्या नावावर खंडणी मागणे , खोट्या बातम्या प्रसिध्द करून अनेकांची बदनामी करणे , या सर्व बाबीला डिजिटल मीडियामुळे आळा बसलेला आहे . कारण डिजिटल मिडियामुळे कोणतीही बातमी लपून राहत नाही व ती तात्काळ लोकांपर्यंत पोहोचत आहे . तरीही काही खंडाणीखोर खवळले असून डिजिटल मीडियाबाबत उलट – सुलट संदेश आपल्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत . ही अतिशय गंभीर बाब आहे . सन्माननीय पंतप्रधान ना . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडियाला कायदेशीररित्या नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या RPP 2019 या बिलाचे “पञकार संरक्षण समिती” व “महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपञ पञकार असोसिएशन” चे सर्व सदस्य स्वागत करीत आहे . बोगस पत्रकारांवर कारवाई झाली पाहिजे या मतावर संस्था ठाम असून या सर्व जाहिरातीमध्ये आपल्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे . आर. एन. आय. वेबसाईटला आपली म्हणजे मा. ना. प्रकाशजी जावडेकर यांच्या मंत्रालयाची मान्यता असल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून करुन दिशाभूल करणारे संदेशातून केला जात आहे . तसेच फेसबुक व व्हाट्सअँप या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून डिजिटल मीडियाची , पञकारांची बदनामी , खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वारंवार केल्याजात आहेत . त्यामुळे डिजिटल मीडियात नव्याने काम करणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांचे मानसिक खच्चीकरण होत आहे . डिजिटल मेडियाची बदनामी , खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी . राज्यातील अनेक जिल्ह्यात अशाप्रकारे बनावट पत्रकार कार्यरत असून आपण या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन कायदेशीर कारवाई करावी . तसेच आपल्या नावाने सोशल मीडियावर खोटे आणि दिशाभूल करणारे संदेश व्हायरल करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना द्याव्यात ही “पञकार संरक्षण समिती” ची प्रमुख मागणी आहे . सध्या देशा सह राज्यात कोरोना विषाणू साथरोग पार्श्वभूमीवर प्रिंट व इलेक्टॉनिक मिडिया याबरोबरच डिजिटल मिडिया महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत उत्कृष्टरितीने कार्यरत असताना व देशाचे पंतप्रधान ना . नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारले जात असताना व त्याचा फायदा लोकांना होत असताना अशा तथाकथित लोकांमुळे डिजिटल इंडिया ( मिडिया ) बदनाम करण्याचे काम सुरु असल्याचे आपल्या निदर्शनास आणून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे . तरी आपण या बाबींची गंभीरपणे दखल घेवून व्हायरल संदेशाबाबत आपल्या पातळीवर चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे . अशी मागणी “पञकार संरक्षण समिती ” चे संस्थापक / अध्यक्ष श्री विनोद पञे , अनिल चौधरी व नंदकिशोर धोञे यांनी निवेदनाच्या माध्यमातून मा. जावेकर यांना केली आहे.