Home महत्वाची बातमी बृहन्मुंबई महानगर पालिकेने केली 97 उमेदवाराच्या आयुष्याची आणि भविष्याची केली लॉकडाऊन मध्ये...

बृहन्मुंबई महानगर पालिकेने केली 97 उमेदवाराच्या आयुष्याची आणि भविष्याची केली लॉकडाऊन मध्ये होळी

519

महानगरपालिकेच्ये वराती माघून घोडे

[ रवि आण्णा जाधव ]
देऊळगाव राजा:-बृहन्मुंबई महानगर पालिकेत होऊ घातलेल्या कामगार भरती 2017-18 मध्ये 1388 पदासाठी कामगार भरती घेतली. सदर कामगार भरती प्रक्रिया आॅनलाईन लेखाप्रणालीने घेऊन त्या भरतीची निवड पहिली निवड यादि हि 3 नोव्हेंबर 2018 रोजी प्रकाशित केली. परंतु या चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीत महानगर पालिकेने प्रतिक्षा यादि जाहिर केली नाही. त्यामुळे सारखे मार्क्स असुन वयात कटलेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्षा यादि केव्हा जाहिर होईल याची विचारणा केली. परंतु महानगर पालिकेने या प्रतिक्षा यादित नाव असलेल्या उमेदवारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यावेळी उमेदवारांची टाळाटाळ केली व त्याना प्रतिक्षा यादि लावण्यात येणार नाही असे कळवले.द्रुतीय श्रेणी,तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणी नोकर भरतीत प्रतिक्षा यादि हि तत्काळच जाहिर करतात.जसे पोलीस, तलाठी,ग्रामसेवक ,परिचर,लिपीक ,शिपाई इत्यादी.पण महानगर पालिका प्रशासनाने प्रतिक्षा यादि लाबंविली ति तब्बल दिड वर्षेाने 14 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार त्यांनी या प्रतिक्षा यादित असलेल्या उमेदवारांची कोणतीही पुर्व सुचना न देता दुसरी146 उमेदवारांची निवड यादि कोराना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या कोविड – 19 बाधीत रूग्णाच्या सेवेत केली. सदर 146 उमेदवारांची नियुक्ती हि कक्ष परीचर म्हणून करून घेण्यात आली होती. म्हणजे नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवार हा कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णासाठीच नियुक्त करण्यात आला आहे स्पष्ट उल्लेख त्या ज्वाईनिग लेटर मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण देशात कडकडीत लाॅकडाऊन लागलेल होते. त्यामुळे मुंबई ला जाण्यासाठी लागणारी वाहन गेल्यावर तिथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था अशा प्रकारच्या अडचणी उमेदवारां समोर होत्या. अगोदरच कोराना विषाणूच्या भितीने सर्व जग भयभीत झाले होते. अशा परिस्थितीत या उमेदवारांची बृहन्मुंबई महानगर पालिकेने मुंबई ला पोहचवण्याची, जेवणाची व राहण्याची कोणतीही व्यवस्था महानगर पालिका प्रशासनाने केलेली नाही अशा प्रकारचे स्पष्ट उत्तर महानगर पालिका प्रशासनाने नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले. उमेदवारांनी महानगर पालिका प्रशासना कडे जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती केली.परंतु महानगर पालिका प्रशासनाने मा. मुख्यमंत्री याचा आदेश असुनही उमेदवारांची अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था केली नाही. जगभरात कोराना विषाणूच सावट, भितीदायक वातावरण,कडक लाॅकडाऊन यामुळे उमेदवारांच्या मनात एक अनामिक भिती महानगर पालिकेने अगोदर उमेदवारांच्या मनात निर्माण केली. याच्याउलट त्यानी उमेदवारांना सागितले तुम्हाला नोकरी करायची असेल तर या अन्यथा तुम्ही तुमच बघून घ्या . अशाप्रकारे महानगर पालिकेने कक्ष परीचय पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवाराची गैरसोय केली. निवड झालेल्या काही उमेदवारांनी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात साठी थोडा जास्तीचा वेळ मागितला तरीही महानगर पालिकेने त्याना कोणतीही सवड दिली नाही. इतर उमेदवारांचे फोन नंबर दया त्याच्याची आम्ही संपर्क करून एकमेकाच्या आश्रयाने येतो पण तेहि महानगर पालिका प्रशासनाने एकले नाहि परिणामी त्यातील 97 उमेदवार मुंबई मध्ये 22 एप्रिल च्या दरम्यान राहण्याची व जेवनाची व्यवस्था वेळेत करू न शकल्याने तिथे पोहचू शकले नाही .त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाने त्या मुलांचे नाव निवड यादीतून वगळून टाकुन त्या उमेदवारांची निवड रद्द केली.या अशा हुकूमशाही वागण्यामुळे गैरहजर राहिलेल्या त्या 97 उमेदवारांना त्यांनी पुन्हा संधी दिली नाही. परिणामी निवड झालेले उमेदवार रस्त्यावर आले त्यांच आयुष्य टागणिला लागले .या दुसऱ्या निवड यादि नंतरच्या निवड यादितील निवड झालेल्या उमेदवारांची महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने जेवणाची व राहण्याची व्यवस्था करून दिली.अशा प्रकारचा दुजाभाव बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाने केला.त्यामुळे या निवड झालेल्या 97 उमेदवारांवर महानगर पालिका प्रशासनाने अन्याय केला असुन. या प्रकरणाची मुख्यमंत्री यांनी चौकशी करून त्या उमेदवारांना पुन्हा सेवेत दाखल करून घ्याव अशी या उमेदवारांची मागणी आहे.