
यवतमाळ – गोदावरी अर्बन, यवतमाळ शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनाप्रित्यर्थ वृक्षलागवड , सॅनिटायझर व मास्क वितरण करून सामाजाप्रती आपल्या सद्भभावना व्यक्त करीत दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल सामाजिक जाणिवेतून वर्धापनदिन साजरा केला.संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी भविष्यात देखिल गोदावरी अर्बन असेच सामाजीक उपक्रम,सचोटीने , सातत्याने ग्राहकांना सुलभ सुविधा देईल तसेच व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान तसेच ग्राहकांनी ठेवलेला विश्वास यामुळे यवतमाळ शाखेने अल्पावधीतच घवघवीत यश संपादन केले असे मत व्यक्त केले.
गोदावरी अर्बन ही सहकार क्षेत्रात सामाजिक जबाबदारी व दायित्वातुन काम करणारी असून आपला पाचवा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर सोयासायटी तथा गुरुमाऊली सोसायटी येथे वृक्षारोपण,मास्क व सॅनिटायझर वाटप करून साजरा केला.तसेच यावेळी यवतमाळ भूषण असलेल्या सिनेअभिनेत्री वैदेही रॉय,इंडियन आयडॉल तथा गायिका स्नेहल चव्हाण यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
उपस्थितीतांनी गोदावरी अर्बनने ग्राहकांना दिलेल्या सुलभ सेवा,सामाजिक बांधिलकीमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळेच संस्था अवघ्या पाच वर्षातच यशोशिखर गाठत आहे अश्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील,सनदी लेखापाल श्रीपाद लापशेटवार,जेष्ठ समाज सेवक नानाभाऊ गाडबैले,स्वातंत्र्यसेनानी देविदास गोपलानी,नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते चंदूभाऊ चौधरी, बन्सीलाल छतानी,नगरसेविका दर्शाना इंगोले,पल्लवी रामटेके,व्यापारी मुकुंदजी औदार्य,राजेश गुल्हाणे,अजय किन्हीकर,संत संताजी पटसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल,सामाजिक कार्यकर्ते रामजी राठी,अनुपमा जगताप,अंजली गुल्हाणे,विश्वरूपे सर,प्रदीप ओमनवार,विजय बुंदेला,गोदावरी अर्बनचे शाखा व्यवस्थापक रवी इंगळे,शाखा अधिकारी अमित पिंपळकर,सर्वश्री सहाय्यक अधिकारी अनिकेत मोहदरे,अमित निकम,आकाश चोले,आर्ती किटे,रोहिणी टेंभरे यांच्यासह सर्व अधिकारी , कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गोदावरी अर्बन कायमच सामाजिक उपक्रम घेत असते यापूर्वी देखिल उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात टँकरने मोफत पाणी वितरण ,जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी शहरातील विविध भागात बाकडे,अंध विद्यालयात खेळणी वाटप असे अनेक समाज उपयोगी उपक्रम संस्था सातत्याने राबवित असते.










































