Home मराठवाडा कोरोना महामारीच्या दडपणाखाली बैलपोळा साजरा

कोरोना महामारीच्या दडपणाखाली बैलपोळा साजरा

245

लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी

जालना  – जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागात बैलपोळा सण कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन साजरा करण्यात आला. शेतकरी राजाने कोरोना महामारीच्या वाढत्या रूग्णांची दखल घेतली असल्याचे जाणवले.

आज पोळ्याच्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत शेतकरी आपापल्या शेतामध्ये, शेतशिवारात , तर काही शेतकऱ्यांनी गावाजवळील परसात बैलांना, गाईंना, वासरांना सजवलं, शिंगावर हिंगुळ चढवला, झुल्या, घागर माळा, गोंडे बांधले,बैलं, गाईम्हशीना, वासरांना रंगबेरंगी पट्टे ओढले, मोरक्या, कासरे, वेसनी, बाशिंग बांधले, पाचवाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलांना, गाईम्हशीना, वासरांना गावात आणले. गावातील मंदिरासमोर गर्दी न करता देव दर्शन करून आपापल्या घरी बैलांचे सुवासिनिंनी ओवाळून पुजन केले.