Home मुंबई सुशांत सिंह रजपूत भविष्यात सुपरस्टार झाले असते त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी...

सुशांत सिंह रजपूत भविष्यात सुपरस्टार झाले असते त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात कोणतेही राजकारण नाही – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

126

मुंबई – सुरेश वाघमारे 

स्टार असो की नसो प्रत्येक माणसाचा जीव महत्वाचा आहे. त्या प्रमाणे सुशांतसिंह रजपूत च्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहीजे. सुशांत सिंह हे अल्पावधीत लोकप्रिय स्टार झाले होते. त्यांचा मृत्यू झाला नसता तर भविष्यात ते मोठे सुपर स्टार झाले असते. त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी ही रास्त मागणी असून यात कोणतेही राजकारण नाही असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई पोलिसांचा संपूर्ण जगात नावलौकिक आहे. मात्र तरीही या पूर्वी अनेक प्रकरणी सीबीआय चौकशी ची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी ची मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा अर्थ कोणी काढू नये. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची मुंबई पोलीस करीत असलेल्या चौकशीत मुंबई पोलिसांच्या नावलौकिकाला न शोभणारी संथगती आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.
हिंदी चित्रपट सृष्टीत अमिताभ बच्चन सारख्या महान कलाकाराला सुरुवातीच्या काळात काम मिळत नव्हते.त्यांना खूप संघर्ष करावा लागला. बॉलिवूड मध्ये काही प्रमाणात कलाकारांना चांगला वाईट अनुभव येत असतो. सुशांत सिंह वर ही अन्याय झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशांत सिंह मृत्यू ची सीबीआय चौकशी होणे योग्य असून यात कोणतेही राजकारण नाही असे ना रामदास आठवले म्हणाले.