Home जळगाव नुरुद्दीन मुल्लाजी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

नुरुद्दीन मुल्लाजी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

530

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील  कासोदा तालुका एरंडोल
येथील सामाजिक कार्यकर्ता नूरुद्दीन मुल्लाजी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे यांची सेवक सेवा भावी संस्था जळगाव यां नी महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर पुरस्कार हा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दरम्यान आपत्ती व्यवस्थापन काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी साठी प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक पत्रकारिता शिक्षण क्षेत्रातील विविध व्यक्तींची निवड करण्यात आली आहे नूरुद्दीन मुल्लाजी यांची निवड करण्यात आली आहे
जळगाव येथील सेवक सेवाभावी संस्था या संस्थेने त्यांच्या कार्याची उल्लेखनीय दखल घेऊन त्यांना सेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी जाहीर केले आहे
लवकरच त्यांना हा पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे
यापूर्वीही त्यांना समाजसेवक, समाजरत्न समाज भूषण , बेस्ट सोशल वर्कर, उत्कृष्ट पत्रकार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत
महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने प्रजा न्यूज महाराष्ट्र टीम ने त्यांचे अभिनंदन केले आहे.