Home महत्वाची बातमी जन्मदात्या आईनेच आपल्या लाडक्या मुलास मारून टाकले ,

जन्मदात्या आईनेच आपल्या लाडक्या मुलास मारून टाकले ,

470
  • पोलिसांची यशस्वी कामगिरी ,
  • अमीन शाह
  • नेर तालुक्यातील मोझर
    येथील चिकन व्यवसायिकाचा खून
    करुन ४ ऑगस्टला त्याचा मृतदेह
    स्मशानभूमीत आढळल्याने गावात
    खळबळ माजली होती. मात्र नेर
    पोलिसांनी सहा दिवसात छडा
    लावत ही खुनाची घटना
    उघडकीस आणून मृतकाची आई
    व तिच्या प्रियकराच्या मदतीने खून
    केल्याची कबुली नेर पोलिसांना
    दिली.
    मोझर येथील चिकन
    व्यवसायिक कमल दमडु चव्हाण
    असे खून झालेल्या इसमाचे
    नाव आहे. मोझर येथील
    स्मशानभूमीत सहा दिवसापूर्वी
    मृतावस्थेत दुपारी अकराच्या
    दरम्यान त्याचा मृतदेह आढळून
    आला होता. त्याच्या शरीरावर
    दारूच्या बाटलीच्या काचेने वार
    केल्याचे दिसून येत होते. मात्र
    मृतकाच्या जवळ कोणतेही पुरावे
    नसल्याने नेर पोलिसांपुढे
    आरोपीला शोधने आव्हानात्मक
    होते. नेर पोलिसांनी गोपनीय
    माहितीच्या आधारे मृतकाची आई
    व गावातील एका व्यक्ती सोबत
    अनैतिक संबंध असल्याचे
    गोपनीय माहिती मिळाली व त्या
    आधारावर कमलची आई व तिच्या
    प्रियकराला पोलिसांनी ताब्यात
    घेतले. बाजीरावचा हीसका
    दाखवताच दोघांनी गुन्ह्याची
    कबुली दिली. तर हा खून त्याच्या
    आईचे व गावातील एका
    व्यक्तीसोबत अनैतिक संबंध
    असल्याने कमल हा अळथळा
    बनत असल्याने त्याचा निर्घुण खून
    करून स्मशानभूमीत टाकल्याची
    कबुली दिली. पोलिसांनी आरोपी
    नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाडे (४२) व
    शोभा दमडु चव्हाण (५०)
    यांच्यावर भादंवि ३०२, ३४
    नुसार गुन्हा दाखल केला.