Home महत्वाची बातमी गणेश उत्सवावर कोरोनाचे संकट मूर्तिकारांना आर्थिक व मानसिक फटका

गणेश उत्सवावर कोरोनाचे संकट मूर्तिकारांना आर्थिक व मानसिक फटका

203

[रवि आण्णा जाधव]
देऊळगाव राजा:-गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन तसेच पोळा,नवरात्रोत्सव कोरोनाच्या या संकटात असल्याने मूर्तीकरांचे मोठा प्रमाणात नुकसान होणार आहे.गणेशोत्सव होणार असून विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचा मुहूर्त अवघ्या काही दिवसांवर आला आहे. परंतु कोरोनामुळे शासनाने अनेक नियम अटी लावल्या असून त्याचा गणेशोत्सवाच्या आनंदावर परिणाम होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ताळेबंदीमुळे बसलेला फटका व त्यात गणेश मूर्तीच्या उंचीची राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमामुळे तालुक्यातील मूर्तीकारांना लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.मुर्ती कलेचे जानेवारी महिण्यापासून सुरु होते व ते गणेशोत्सव सुरू होईपर्यंत चालते वर्षातील पाच ते सहा महिने या मूर्तिकलाकारांना काम मिळते. पण मूर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य ताळेबंदीमुळे मिळालेले नसल्याने सध्या बाजारपेठेत जे साहित्य उपलब्ध झाले त्याच साहित्यावर मूर्तिकलेचे काम मूर्तिकार करीत आहेत.मात्र ,यंदा कोरोनाने अनेक मूर्तिकार बेरोजगार झाले आहेत. यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे.कोरोनाच्या विघ्नामुळे मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत यवडे मात्र खरे.