जळगाव

कोरोना जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाचशेचा आकडा पार

Advertisements
Advertisements

जिल्ह्यात नव्याने 528 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

जिल्ह्यात कोरोनाने दहा हजारांचा टप्पा ओलांडला..

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी पाचशेचा आकडा पार केला असून एकूण रुग्णसंख्येचा 15 हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने 528 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 15 हजार 391 झाली आहे. सर्वाधिक 94 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी दिवसभरात 375 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. मंगळवारी नव्याने 528 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 8, अमळनेर 50, चोपडा 30, पाचोरा 17, भडगाव 48, धरणगाव 63, यावल 8, एरंडोल 51, जामनेर 50, रावेर 16, पारोळा 10, चाळीसगाव 45, मुक्ताईनगर 14, बोदवड 3 इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 2, जळगाव शहर, चोपडा, एरंडोल, व पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी
दिली आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

कोविड रुग्णांची अशीही सेवा देणारे योध्दा डॉक्टर – कोविड केअर युनिट तर्फे गौरव – डॉ पराग चौधरी व डॉ पंकज पाटील

रावेर (शरीफ शेख)  जळगाव – शहरातील कोविंड रुग्णांची संख्या वाढत आहे सरकारी रुग्णालय त्यासाठी कमी ...
जळगाव

दहिवद येथे जपानची मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीचा प्रयोग..ग्रामपंचायतीमार्फत १००० देशी वृक्षांची लागवड

अमळनेर –  जपान या देशात मियावाकी पध्दतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली ...
जळगाव

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांची निवड…

रावेर (शरीफ शेख)  ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रिय कार्यालय प्लॉट नं.३५. गोंडवाना नगर क्र.०२, ...
जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...