महत्वाची बातमी

त्या नराधमांने दोन चिमुकल्या मुलींना बनविले शिकार ,

Advertisements
Advertisements

त्या नराधमांने दोन चिमुकल्या मुलींना बनविले शिकार ,

आरोपीस अटक ,

अमीन शाह

पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील
गावात आईच्या कुशीत झोपलेल्या बालिकेला
उचलून नेत तीन नराधमांनी अमानुष
अत्याचार केल्याच्या घटनेची शाई वाळलीच
नसताना अंगणात खेळत असलेल्या दोन
बालिकांवर एका २३ वर्षीय नराधमाने
अत्याचार केल्याची घटना रामनगर पोलिस
ठाण्याच्या हद्दीत घडली. यातून अंगणात
खेळणारया बालिकाही आता कितपत सुरक्षित,
असा प्रश्न समोर आला आहे.
नराधमाने अत्याचार केलेल्या एका मुलीचे
वय ७ वर्षे तर दुसरया मुलीचे वय ९ वर्षे आहे.
यातील एक अल्पवयीन मुलगी शेजारच्या घरी
राहणारया अल्पवयीन मुलीसोबत खेळायला
गेली होती. दोन्ही मुली अंगणात खेळत
असताना तेथे हा युवक आला. यावेळी
७ वर्ष वयाच्या मुलीचे आई वडील घरी नव्हते.
हीच संधी साधून या युवकाने दोन्ही मुलींना
सात वर्षीय मुलीच्या घरात नेत त्यांच्यावर
अत्याचार केला. या घटनेची कोठेही वाच्यता
केल्यास या युवकाने दोन्ही मुलींना जिवे
मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दहशतीत
असलेल्या दोन्ही मुलींनी घटना कोणालाही
सांगितली नव्हती. अखेर आज त्यांनी आपल्या
आई वडिलांना ही घटना सांगितली. त्यानंतर
मुलींच्या घरच्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात
तक्रार दिली.
रामनगरचे ठाणेदार धनंजय जळक यांनी
आरोपीला अटक केली.
घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी
जगताप यांनी भेट देत चौकशीबाबत मार्गदर्शन
केले. दोन्ही बालिकांना उपचाराकरीता
शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे.
पोलिस अटक करायला गेले तेव्हा हा
अत्याचारी युवक घरातच दडून बसला होता.
पोलिसांनी या घटनेबाबत पोस्कोच्या
कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आहे ,

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...