Home विदर्भ आदिवासी गोवारी जमातीने साजरा केला जागतिक आदिवासी दिन

आदिवासी गोवारी जमातीने साजरा केला जागतिक आदिवासी दिन

472

आज दि.9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन आदिवासी गोवारी जमातीने सोशल डिस्टन्स(सामूहिक अंतर) ठेवून लक्ष्मीनगर येथे पिवळा झेंडा उभारून साजरा करण्यात आला.हा दिवस क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्य मूळ निवासी असलेल्या आदिवासी जमातीला देशाच्या मुख्य प्रवाहात आणून न्याय हक्कासाठी तयार करून नवीन पिढीच्या उत्थानासाठी साजरा केल्या जातो.
आजवर आदिवासी गोवारी जमात ही विदर्भात जास्त करून वास्तव्य करतो, 23 नोव्हेंबर 1994 रोजी झालेल्या हत्याकांडाची झड अजूनही ही जमात राजकारणाच्या होणाऱ्या अश्वासनिक प्रवाहाला बळी पडत आहे,परंतु 14 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या हाय कोर्टाच्या निर्णयाने गोवारी जमातीला शाश्वत न्याय प्रदान करून उजागर केले,आणि त्या शाहिद झालेल्या हुतात्मास खऱ्या अर्थाने अधिकार मिळवून दिला,ह्या निमित्याने गोंडवाना अधिकार अभियान तर्फे लक्ष्मीनगर,यवतमाळ येथे पिवळा झेंडा उभारून परिवार समेत हा दिवस साजरा केला जातो.दरम्यान गोवारी जमातीतील पिढीला शैक्षणिक,सामाजिक,व्यावसायिक,राजनैतिक विकासाचा आधार कसा बनवावा ह्या विषयावर चर्चा करण्यात आली,बचत गटाच्या माध्यमातून आजतोवर अनेक महिलांना व्यावसायिक स्वरूप देण्यात आले तसेच अनेक आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांना शासकीय/निम शासकीय सेवेत सहभाग दिला,पोलीस भर्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेत व आदिवासीच नाही तर अनेक समाजातील मुला मुलींनी ह्या संधीचा फायदा घेतला,आता पुढील वाटचालीसाठी गोंडवाना अधिकार अभियान च्या समितीने नवीन कार्याची आखणी केली व लवकरच आदिवासी बांधवांच्या सेवेत कार्यरत होईल असे प्रतिपादन कमिटीचे मुख्य डॉ.विवेक चौधरी,संतोषभाऊ वाघाडे,रविकुमार दुधकोर यांनी केले.कार्यक्रमाच्या दरम्यान संतोषभाऊ वाघाडे,राविकुमार दुधकोर,मंगेशभाऊ सहारे,राजूभाऊ राऊत,सुरेशभाऊ चौधरी,अतुल वाघ,यसनसुरे,राजेंद्र चचाने,सौ.सायली चौधरी,सौ.पुजाताई सोनटक्के,कुणाल सोनटक्के,कु.चैताली सोनटक्के इ. उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ.विवेक चौधरी यांनी केले.