Home सोलापुर राज्य , जिल्हास्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन…!

राज्य , जिल्हास्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन…!

126

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. ०७ :- राष्ट्रजागृतीचे अग्रदूत तथा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य मराठी पत्रकार संघाने विविध पुरस्काराचे आज मोठया थाटात वितरण केले.

पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला हा पुरस्कार वितरण(२0-२0)सोहळा मोठया थाटात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेने करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख हे होते. प्रास्ताविक व स्वागत राज्याध्यक्ष स्वामींनाथ हरवाळकर यांनी केली.या वेळी बोलताना पूज्य बसवलिंग महास्वामीजीं यांनी पत्रकारांनी स्वाभिमानी बाण्याने लिखाण करण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन प्रा. खंडू खंडाळे यांनी केली तर आभार इंजि. सिद्धांत हरवाळकर यांनी मानले

पुरस्काराचे मानकरी डाॅ. शरणबसव हिरेमठ,सुमित्रा बनसोडे , डाॅ.राजेंद्र पाटील डाॅ.बसवराज चिणकेकर,गणपतराव कलशेट्टी, उमेश नेवाळे, स्नेहा आगरखेड, ऋषिकेश जाधव , आकाश राठोड,संदिप मडिखांबे, राॅबिनहुड आर्मी, मराठा सेवा संघ ,मल्लिनाथ स्वामी ,सोशल मिडीया :- राहल भकरे ,मुबारक कोरबु,अब्दुल शेख,गणेश भालेराव ,आदर्श लोकाभिमुख पत्रकार :- नागप्पा आष्टगी ,यशवंत पाटील,शिवानंद गोगांव ,स्वामीराव गायकवाड ,राजु जगताप,दयानंद दणुरे,महेश गायकवाड,शंभुलिंग अकतनाळ.आदर्श शाळा जि प मराठी शाळा नागणसुर,जि प कन्नड शाळा जेऊर,फैजान नुर उर्दू वाचनालय.