Home जळगाव साखळी उपोषणाचा चौदावा दिवस , पत्रकारांचे अभिनंदन तर जे एन यू...

साखळी उपोषणाचा चौदावा दिवस , पत्रकारांचे अभिनंदन तर जे एन यू वरील भ्याड हल्ला व नानक साहिब गुरुद्वार व पाकिस्तानचा निषेध..

20
0

शरीफ शेख

रावेर , दि. ०६ :- जळगाव मुस्लिम मंच द्वारा सुरू असलेल्या नागरिकत्व कायदा विरुद्ध साखळी उपोषणाचा १४ वा दिवस हा इस्लामपुरा येथील युवकांच्या सक्रिय सहभागातून पार पडला तसेच मूजे महाविद्यालयातील तरुणाई यांनी सुद्धा या उपोषणात भाग घेऊन आपली उपस्थिती दर्शवली.

उपोषण हे पत्रकारांना सुपुर्द सहा जानेवारी हा पत्रकार दिन असल्याने मुस्लिम मंच तर्फे भारतातील काही निवडक पत्रकार तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रतिमा दाखवून तसेच पाकिस्तान येथील नानक साहिब गुरुद्वारा वर झालेल्या दगडफेकीचा व पाकिस्तानचा त्याच प्रमाणे जे एन यु वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
पत्रकार दिनाचे महत्व व या शासनाला उघड़े पाड़नारे पत्रकार यांची माहीती मंचचे संयोजक फारुक शेख यांनी विशद केले व आजही आपल्या जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्र आपल्या बातम्या व आपली बाजू सक्षम पणे मांडीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन सुद्धा केले
उपोषणाची सुरुवात अंसार सर यांच्या पवित्र कुराणाने झाली तर समारोप मौलाना असलम अश्रफी यांच्या दुवा ने करण्यात आली.

यांनी केले मार्गदर्शन
शब्बीर शेख, असलम मौलाना, अब्दुल अहमद ,शेख सय्यद, अयाज अली, बहद शेख ,मुफ्ती हारून नदवी, मौलाना शरीफ, मुफ़्ती अफजलखान, शाहिद शेख, वैशाली पवार ,अविनाश तायडे व फर्दिन अली यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकने यांना दिले निवेदन

मुस्ती अफजल यांच्या नेतृत्वात नईम बशीर, सय्यद शाहिद, अहत फारुकी, शकील बादली वाला, शेख शब्बीर, अनवर सिकलिगर, असलम अश्रफी ,मोहसीन खान, व एडवोकेट आयुब खान यांनी निवेदन दिले , यांची होती उपस्थित.

सय्यद शाहिद ,खालीद शेख,शेख बशीर, सय्यद इमरान, अरबाज खान ,फिरोज खान, नासिर खान, अजित खान, सय्यद वाजीत, नासिर रहमान ,अशफाक मिर्ज़ा, शरीफ पिंजारी, जावेद फकीरा, युसुफ इमरान,
करीम सालार गफ्फार मलिक मुकुंद सपकाळे वनिता राज कल्पिता पाटील विकास मोरे अल्फा पटेल राज शिंदे भूषण भदाणे जकी पटेल फारुक शेख आदींची उपस्थिती होती.