Home मराठवाडा कुंभार पिंपळगावात श्रीराम भक्तांनी आरती, फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा

कुंभार पिंपळगावात श्रीराम भक्तांनी आरती, फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा

98

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – आयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर कुंभार पिंपळगाव येथील मंदिराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गावात श्रीराम भक्तांनी गल्लोगल्ली फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. येथील राममंदिर, हनुमान मंदिर परिसरात आरती करण्यात आली. प्रसाद वाटण्यात आला. गावात कोरोना महामारीचे गांभीर्य वाढल्याने रामभक्तांनी याची जाणीव ठेवून मोजक्या चार- चौघात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले . येथील पोलिस दुरक्षेत्र विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन कापुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.