Home विदर्भ यवतमाळ जिल्हातीलतीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ,  79 जणांची नव्याने भर

यवतमाळ जिल्हातीलतीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ,  79 जणांची नव्याने भर

103

आठ जणांची कोरोनावर मात…!

यवतमाळ , दि. 03 :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युमध्ये तीन जणांची भर पडल्याने आतापर्यंत एकूण मृत्युची संख्या 32 झाली आहे. तर जिल्ह्यात आज (दि. 3) 79 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटर मध्ये भरती असलेले आठ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवारी मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील कुभारंपुरा येथील 66 वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील महादेव नगर येथील 75 वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील प्रभात नगर येथील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि. ) पॉझेटिव्ह आलेल्या 79 जणांमध्ये 36 पुरुष व 43 महिलांचा समावेश आहे. यात पुसद शहरातील खतीब वॉर्ड येथील दोन पुरुष, पुसद शहरातील गणेश वॉर्ड येथील एक पुरुष, वॉर्ड क्रमांक 1 येथील एक महिला, पुसद शहरातील पाच पुरुष व पाच महिला, पुसद तालुक्यातील पारडी येथील एक महिला, श्रीरामपुर येथील एक पुरुष, मारेगाव तालुक्यातील काळी दौलत येथील एक महिला, पांढरकवडा शहरातील 13 महिला व नऊ पुरुष, पांढरकवडा शहरातील वैभव नगर येथील एक महिला, यवतमाळ शहरातील एक पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील अवधूतवाडी येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील काळे ले-आऊट, वडगाव येथील एक महिला, यवतमाळ शहरातील विश्वकर्मा नगर, पिंपळगाव येथील पुरुष, जामा मशीद वॉर्ड येथील एक पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील पाच पुरुष व आठ महिला, दिग्रस शहरातील पाटीपूरा येथील एक पुरुष, आर्णि शहरातील पाच पुरुष व नऊ महिला पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात रविवारपर्यंत 394 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यापैकी एकाचा मृत्यु झाल्याने हा आकडा 393 झाला. तर आज नव्याने 81 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे हा आकडा 474 वर पोहचला. मात्र यापैकी आणखी दोन जणांचा मृत्यु आणि पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या 8 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 464 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1226 झाली आहे. यापैकी 730 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 32 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 126 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 19868 नमुने पाठविले असून यापैकी 15874 प्राप्त तर 3994 अप्राप्त आहेत. तसेच 14648 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.