Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुढील आदेशापर्यंत (लॉकडावुन) ताळेबंदी –...

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुढील आदेशापर्यंत (लॉकडावुन) ताळेबंदी – डॉ. विपिन इटनकर

91

नांदेड, दि. १ ( राजेश एन भांगे )

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेवून पुढील आदेश पावेतो दिनांक 31 जुलै, 2020 नंतरही ताळेबंदीचा (लॉकडाऊन) कालावधी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वाढविला आहे.
यापुर्वीच्या आदेशान्वये नियमावलीसह दिनांक 31 जुलै, 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटीं व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सकाळी 7-00 ते सायंकाळी 5-00 वाजपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. दिनांक 19 जुलै, 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दिनांक 31 जुलै, 2020 नंतरही ताळेबंदीचा कालावधी पुढील आदेश पावेतो वाढविण्यात येत आहे.