Home जळगाव जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत दि.३१ जुलै रोजी साधणार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरीकांशी...

जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत दि.३१ जुलै रोजी साधणार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद

35
0

पाचोरा – प्रतिनिधी

जळगाव – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. या प्रयत्नांना आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेने समर्थ साथ दिली आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात काही प्रश्न असु शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शुक्रवार दि. ३१ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजता जनतेशी लाईव्ह स्वरूपात संवाद साधून जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. हा संवाद https://www.facebook.co/CollectorateJalgaon या फेसबुक पेजवरून साधणार आहेत. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना विषाणू व त्यासंबंधी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत त्यांच्या मनातील शंका, समस्या, प्रश्न या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडावेत. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting