Home विदर्भ शिव गणेश उत्सव मंडळाच्या वतिने लॉकडाऊन काळात शहरातील गोरगरिबांना, निर्वासित लोकांना अन्नदान…..

शिव गणेश उत्सव मंडळाच्या वतिने लॉकडाऊन काळात शहरातील गोरगरिबांना, निर्वासित लोकांना अन्नदान…..

42
0

सामाजिक बांधिलकी जोपासत अविरत जनसेवेत शिवगणेश उत्सव मंडळ….

यवतमाळ – शहरात लॉकडाऊन काळात रस्त्यांवर आपले जीवन घालविणाऱ्या लोकांसाठी सदैव सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणाऱ्या शिवगणेश उत्सव मंडळाने मदतीचा हात देत त्यांना रोज भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यवतमाळ शहरात रस्त्यांवर राहणारे गोरगरीब आणि अपंग , निर्वासितांची संख्या फार मोठी आहे .मंडळाच्या वतीने नेहमीच समाजीक उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने मंडळाचे मार्गदर्शक मनसेचे अनिलभाऊ हमदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कोरोना महामारीच्या संकट काळात मंडळाच्या वतीने दररोज शेकडो लोकांना जेवणाचे पाकीट पोहचविण्यात येत आहे.मंडळाचे कार्यकर्ते रोज शहरातील विविध भागात रस्त्यांवर राहणाऱ्या तसेच मंदिरा च्या परिसरातील गोरगरिबांना जेवणाचे पाकीट नेऊन देतात.मंडळाने या पूर्वीही लॉकडाऊन काळात यवतमाळकर जनतेसाठी धान्य , अन्नदान, वैद्यकीय सेवा, मास्क वाटप ,सॅनेटायझर वाटप,आणि संकटात असलेल्यांना मदतीचा हात दिलेला आहे.तसेच दरवर्षी पर्यावरण, स्वच्छता, भ्रूणहत्या, लोकसंख्या, जनजागृती च्या विविध विषयांवर उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमात मंडळाचे राजेश दंडगे, संतोष शर्मा, सुनील हमदापुरे,योगेश इंदूरकर,पराग गाढवे, अक्षय अगम, सुरज देशमुख, चिंटू काळे, सोनू मस्के, कार्तिक चचाने,निलेश बानोरे,ललित जैन,विवेक लोढिया,गौतम राजा,रोहित जाधव,पराग ढोमणे व इतर कार्यकर्ते अविरत मेहनत घेत आहेत.