सातारा

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ ज्योतिर्विद ज्योतिषालंकार श्रीयुत श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे निधन

Advertisements
Advertisements

सतीश डोंगरे

मायणी / सातारा :- अभ्यासक्रमाच्या शिस्तीतून, विज्ञानाच्या भूमिकेतून व एका शास्त्रीय चौकटीतून ज्योतिष्याची शिकवण देत गेल्या काही दशकात अनेक उत्तम ‘ज्योतिषशास्त्री’ घडविणाऱ्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ ज्योतिर्विद ज्योतिषालंकार श्रीयुत श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे आज, शनिवार, २५ जुलै २०२० ला रात्री ९ वाजताच्या सुमारास डोंबिवली येथे निधन झाले.

श्री. श्री. भट नावाने ते ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष प्रेमी व आप्तजनांमध्ये ख्यात होते. खरे तर महाराष्ट्रातील ज्योतिष अभ्यासकांचे ते पितामह होते. मृदू व मधुभाषी असणारे श्री. श्री. भट शास्त्र म्हणून ज्योतिष शास्त्राची बाजू उचलून धरायचे त्यावेळी या शास्त्राच्या भल्या भल्या विरोधकांनाही निपचित करण्याचे कसब त्यांच्या वाणीत होते.

ज्योतिषींच्या कपाळी असलेला भोंदुगिरीचा कलंक पुसण्यासाठी त्यांनी पाठ्यक्रम ठरवून या शास्त्राच्या अभ्यासाला दिशा दिली व महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या माध्यमातून हजारो ज्योतिषशास्त्री निर्माण केले. आजही ज्योतिषशास्त्री पदवीला मानाचे स्थान असून ती पदवी मिळविणारी व्यक्ती म्हणजे खात्रीने व प्रामाणिकपणे मार्गदर्शन करणारा ज्योतिषी अशी प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे, हे श्री. श्री. भटांच्या कार्याचे फलित होय.

ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठी ‘ज्योतिष सोबती’ या रेडीरेकनर स्वरूपाच्या अद्वितीय पुस्तकाचे त्यांनी संपादन केले. याशिवाय त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. ‘ज्योतिष्याच्या गाभाऱ्यात’ हेही त्यांचे सर्वाधिक वाचकप्रिय पुस्तक आहे. ‘धनुर्धारी’ मासिकातून प्रकाशित होणारे राशीभविष्य देखील अतिशय लोकप्रिय होते.

श्री. श्री. भटांना ज्योतिष्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला व त्यात त्यांनी स्वत:च्या चौकस बुद्धिमत्तेने भर घालून या शास्त्राला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. ज्योतिष अध्ययन व अध्यापन हे जणु त्यांचे व्रत होते. काही मिनिटांच्या चर्चेतही ज्योतिष शास्त्रातील एखाद्या गूढ विषयाची ते लीलया व सोदाहरण उकल करून देत.

ज्योतिषशास्त्रासाठी अविरत कार्य करणाऱ्या श्री. श्री. भट यांना अनेक उपाधी, सन्मान, पुरस्कार मिळाले, मात्र सदैव ग्रह, तारे व आकाशमंडलाच्या क्रियाकलापांचा शोध घेणाऱ्या या विद्वानाचे पाय जमिनीवरच टिकून राहिले. असंख्य नव्या, जुन्या व नवशिक्या ज्योतिषींशी व या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध होते.

नागपूर येथे नोव्हेंबर १९९७ मध्ये झालेल्या आठव्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. या सम्मेलनाच्या प्रसिद्धी विभागाचे काम माझ्याकडे होते. त्यानिमित्ताने त्यांच्याशी काहीशी जवळीकही निर्माण झाली होती. २०१५ मध्ये ‘ज्योतिष प्रवाह’ मासिक सुरू केले त्यावेळी त्यांचे आशीर्वाद तर लाभलेच, शिवाय जुन्या परिचयाला उजाळाही मिळाला. तो शेवटपर्यंत कायम राहिला.

गेल्या काही वर्षात वार्धक्यासोबतच प्रकृती संबंधीचे त्रास व कानांनी पुकारलेले असहकार्य यामुळे वार्तालाप दुरापास्त होत गेला होता, अशातच आज रात्री अचानक ही बातमी आली. रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने कोविद- कोरोनाची शक्यता वाटल्याने तत्संबंधी टेस्ट देखील करण्यात आली, मात्र त्याचा अहवाल येण्याअगोदरच त्यांची प्राणज्योत निमाली.

श्री. श्री. भट यांच्या सुविद्य पत्नीचे गेल्या काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. अशातच हा दुसरा व तितकाच मोठा आघात त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आहे. तो पेलण्याचे बळ त्यांना लाभावे.

श्री. श्री. भट यांचे कुटुंबीय, तसेच असंख्य ज्योतिष अभ्यासकांच्या संवेदनांमध्ये ‘ज्योतिष प्रवाह’ परिवार देखील सहभागी आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

सातारा

मायणीत उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरच कौतुकास्पद – प्रांत अश्विनी जिरंगे

कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करणे गरजेचे अशा दानशूर व्यक्तीचे कौतुक प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे  ...
मराठवाडा

अंतरवाली टेंभी येथील तरूण शेतकरी राधाकिसन गायकवाड यांचे निधन

लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी जालना – घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील तरूण शेतकरी राधाकिसन उत्तमराव गायकवाड ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 143 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु

सातारा – प्रतिनिधी जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 143 जणांचे अहवाल ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 168 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित , 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

सातारा / प्रतिनिधी – जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 168 जणांचे ...
सातारा

प्रामाणिक कार्यकर्ता हीच माझी दौलत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर

मायणी – सतीश डोंगरे सातारा – सध्या अनेक राजकीय नेत्यांकडे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा वनवा आहे एका ...