Home नांदेड नायगाव (बा.) येथे नगरपंचायत व पोलिस पथकाने केली नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

नायगाव (बा.) येथे नगरपंचायत व पोलिस पथकाने केली नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

632

नांदेड , दि. २९ ( राजेश एन भांगे ) –
नांदेड जिल्ह्या मध्ये कोरोनाची वाढती रूग्ग संख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी १२ जुलै ते २३ जुलै पर्यंत लाॕकडावुन जारी केला होता. त्या नंतर २४ जुलै पासुन अटि व नियमाच्या शर्तिंच्या आधिन राहुन सकाळी ७ ते सायं ५ वाजे पर्यंत जिल्ह्यातील बाजार पेठ चालु ठेवण्याचे निर्देश दिले.
त्याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर शहरात विना मास्क फिरणारे नागरीक तसेच भाजी विक्रेत्यांना ठरावुन दिलेल्या जागी न बसल्या बद्दल नायगांव बा. नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत नियमाभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कायवाई केली.
सदर कारावाई पोलिस निरिक्षक श्री आर पडवळ साहेब ए.पी.आय श्री जी.पाटेकर, यांच्या नेत्रत्वाखाली गुट्टे, शिंदे, पवळे, व नगरपंचायत कर्मचारी मिळून केली.