Home विदर्भ शेतकरी आत्महत्येचे दोन प्रकरणे पात्र..!

शेतकरी आत्महत्येचे दोन प्रकरणे पात्र..!

104

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 28 :- शेतकरी आत्महत्या जिल्हास्तरीय समितीच्या आज झालेल्या बैठकीत शेतकरी आत्महत्येचे 2 प्रकरणे पात्र ठरलीत.अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकित यावेळी समिती समोर शेतकरी आत्महत्येची 23 प्रकरणे ठेवण्यात आली. यातील 15 प्रकरणे विविध कारणाने समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते अपात्र ठरविली तर 4 प्रकरणे फेरचौकशीसाठी तालुका समितीकडे पाठविण्यात आले व 2 प्रकरण वगळण्यात आली.
बैठकित सादर करण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्येच्या 3 प्रकरणापैकी हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील प्रफुल मातकर , नांदगाव येथील येथील हेंमत घोडे या शेतक-यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या योजनेतुन लाभ मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, पोलिस विभागाचे प्रतिनिधी ,जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी, सामान्य रुग्णालयाचे डॉ. नितीन निमोदिया , अशासकिय सदस्य राजेश्वर गांडोळे उपस्थित होते.