
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 53
एकूण रुग्ण 161
वर्धा , दि. 28 :- जिल्ह्यात आज 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्यात एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 103 झाली आहे. तसेच आज 13 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून यात आर्वी 8 आणि पुलगाव 2, आणि वर्धा 2, समुद्रपूर 1 रुग्णांचा समावेश आहे.
आज सेवाग्राम रुग्णालयातून 15 कोरोनाबधित रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. योग्य उपचार आणि रुग्णांची रोग प्रतिकार शक्तीच्या जोरोवर त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्र मोकळे होताच त्यांना घरी सोडण्यात येईल.
आज 121 अहवाल प्राप्त झाले असून 13 रुग्ण कोरोना बाधित आहेत. बाधित रुग्णांमध्ये 8 रुग्ण आर्वी शहरातील असून 50, 30 , 50 , 49 , 33 आणि 17 वर्षीय पुरुषाचा तर 19 व 82 वर्षीय महिलेचा समावेश आहे . वर्धा तालुक्यातील 1 सेवाग्राम येथील 42 वर्ष व सावंगी येथील 29 वर्षीय महिला तसेच पुलगाव मधील 43 व 32 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तसेच समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील 53 वर्षीय पुरुष कोरोनाबधित असल्याचे निदान झाले आहे.
आजच्या कोरोना बाधित रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 161 वर पोहचली असून 103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53 झाली आहे.
प्रयोगशालेय तपासण्या
जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 803 कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 7653 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 7 हजार 443 निगेटिव्ह तर 161 पॉझिटिव्ह आहेत, तसेच 170 अहवाल प्रलंबित आहेत. आज 109स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आयसोलेशन मध्ये 249 व्यक्ती आहेत.
गृह विलगिकरण
67 हजार 304 व्यक्तींना आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 61 हजार 234 व्यक्तींचा गृहवीलगिकरण कालावधी संपला असून 6070 व्यक्ती आज गृहवीलगिकरणात आहेत.तसेच 297 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.










































