Home महत्वाची बातमी अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्र असलेल्या ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या मस्तकावरील सुवर्णलेपीत छत्री...

अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्र असलेल्या ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या मस्तकावरील सुवर्णलेपीत छत्री ची चोरी ,

17
0

सर्वत्र उडाली खळबळ ,

अमीन शाह

जुन्नर ,

अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्र असलेल्या ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या मस्तकावरील सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली आहे. आज पहाटे २ वाजून 40 मीनिटांनी ही घटना घडल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आले.याबाबत विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ने दिलेल्या माहिती नुसार माहीतीनुसार तोंड झाकलेले दोन चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

साधारण दोन किलो वजनाच्या चांदीत घडवलेली सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर गाभार्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी, एक दानपेटी फोडून ही दानपेटी मंदिराजवळील नदीपात्र परिसरात फेकून दिल्याची फिर्याद देवस्थान ट्रस्टच्या वतीने ओतूर पोलिसांकडे देण्यात आली आहे., एप्रिल महीन्यात तिजोरीतील रकमेची मोजदाद करण्यात आली होती. त्यानंतर लॅाकडाऊन मुळे मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरता बंद असल्याने दानपेटीत फारशी रक्कम नसावी अशी शक्यता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी.व्ही. मांडे यांनी व्यक्त केली.
चोरीच्या घटनेची माहीती कळताच जुन्नर पोलिस उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना,ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि पथकाने मंदिरात भेट देऊन परिसरातील पाहणी केली. मंदिराच्या भोवती असलेल्या दगडी कुंपणावरून चढून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला असावा अशी शक्यता कांबळे यांनी व्यक्त केली. दिड वर्षांपूर्वी देखील या मंदिरात चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. सध्या करोना आपत्ती काळात मंदिर बंद असल्याने चोरट्यांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा कयास आहे.

Unlimited Reseller Hosting