Home नांदेड नांदेड येथुन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची उचलबांगडी

नांदेड येथुन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची उचलबांगडी

125

नांदेड , दि. २७ ( राजेश एन भांगे ) –
नवनिर्वाचित आमदार झाल्यानंतर आमदार मोहनराव हंबर्डे यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली होती, याबाबत त्यांनी जिल्ह्याचे पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कानावर ही बाब घालून दिल्यानंतर तडकाफडकी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नांदेड येथून उचलबांगडी करण्यात आली.

विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या मतदारसंघातील असून त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अनेक गोष्टींचा अभाव जाणवला. त्याठिकाणी रुग्णांची मोठी हेळसांड आणि स्वच्छतेचा अभाव या गोष्टी प्रकर्षाने जाणवत असल्याचे आमदार हंबर्डे यांनी सांगितले. त्यांनी ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदनाद्वारे यासंदर्भात 3 फेब्रुवारी 20 रोजी अधिष्ठाता डॉक्टर डॉ. मस्के यांची नांदेड येथून बदली करावी, अशी मागणी केली होती.

त्यानंतर दि.28 जून रोजी आमदार हंबर्डे हे औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये कोरोनाचा उपचार घेत असताना त्यांनी पालक मंत्री अशोक चव्हाण यांना दूरध्वनीद्वारे अधिष्ठाता डॉ.मस्के यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आमदार हंबर्डे यांच्या नाराजीचा सूर संबंधितांना व्यक्त करून दाखविला होता. त्यानंतरही अधिष्ठाता डॉ. मस्के यांच्या कामांमध्ये कुठलीही सुधारणा दिसून आली नव्हती. या गोष्टीमुळे आमदार हंबर्डे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेऊन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथून अधिष्ठाता डॉ. मस्के यांची उचलबांगडी केली.