Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथील प्रसिद्ध वैद्य नारायण इस्वळे यांचे निधन

कुंभार पिंपळगाव येथील प्रसिद्ध वैद्य नारायण इस्वळे यांचे निधन

46
0

लक्ष्मण बिलोरे – जालना

जालना – जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील रहिवासी वैद्य नारायण रामभाऊ ईस्वळे (80) यांचे सोमवारी (दि.27) निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांवर आयुर्वेदीक उपचार करीत होते. अत्यंत अल्पदरात त्यांनी जुनाट आजार असलेल्या शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना दुरूस्त केले. रात्री 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ.परमेश्‍वर, डॉ. रामेश्‍वर इस्वळे यांचे ते वडील होत.

हे पण वाचा
वैद्य नारायण इस्वळे यांची आयुर्वेदिक उपचाराची परंपरा पिढीजात होती. असाध्य जुनाट रोगांवर खात्रीने उपचार व्हायचा, गॅंगरीन, मूळव्याध, कावीळ, या आजाराचे रूग्ण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून यायचे. वैद्य नारायण इस्वळे यांनी आयुष्यात कुठलेही व्यसन केले नाही. आयुर्वेदिक उपचाराबरोबरच आयुर्वेदिक दंतमंजन, सुगंधी अगरबत्ती, अशी काही आयुर्वेदिक उत्पादने त्यांनी केली होती.

Unlimited Reseller Hosting