Home विदर्भ चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त…

चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त…

137

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

रवि माळवी

यवतमाळ , दि. २० :- चोरट्यांनी चोरी केलेल्या मोटार सायकली विक्री करीता पुसद येथील बाबासाहेब नाईक, इंजिनियरींग कॉलेज परिसरात आले असता यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली व चोरी केलेल्या तीन मोटार सायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. पोलीसांनी ही कारवाई दिनांक २० जुलै रोजी केली.
सुरेश मुंगाराम राठोड, शेख मुन्ना शेख उस्माण दोन्ही रा.ईसापुर धरण असे पोलीसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दिनांक २० जुलै रोजी स्थानिक गुन्हे शखेतील पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथक गुन्हेगार शोधकामी पुसद शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन ईसापूर धारण येथील २ ईसम त्यांचे ताब्यात असलेली चोरीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल विक्री करीता पुसद येथील बाबासाहेब नाईक इंजिनियरींग कॉलेज परिसरात येणार अशा माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथकाने पंचासह रवाना होवून बाबासाहेब नाईक, इंजिनियरींग कॉलेज परिसरात सापळा लावून थांबले असता माहीती प्रमाणे वर्णनाचे दोन ईसम एका काळ्या रंगाचे विनाक्रमांकाचे स्प्लेंडर मोटार सायकलवर इंजिनियरींग कॉलेजचे गेट समोर दिसल्याने पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी दोन्ही ईसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे असलेल्या मोटार सायकलचे मालकी बाबत विचारपुस केली असता आरोपी सुरेश राठोड याने मागील दहा दिवसांपुर्वी सदरची मोटार सायकल मित्र शेख मुन्ना याचे सोबत मिळुन चोरी केली असल्याचे सांगीतल्याने नमुद मोटार सायकल व अरोपी सुरेश याचे अंगझडतीत मिळुन आलेले मोबाईल जप्त करुन यापुर्वी सुध्दा त्यांनी अशा प्रकारे मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची दाट संशय असल्याने त्यांचे कडे अधिक विचारपुस केली असता यापुर्वी २० दिवसांआधी पुसद येथील आठवडी बाजार परिसरातुन हिरोहोन्डा स्प्लेंडर व उमरखेड येथील मध्यवर्ती बँकेसमोरुन दिड महिण्यापुर्वी एक हिरो पॅशन मोटार सायकल चोरी केली असल्याचे आरोपी सुरेश राठोड याने सांगीतले. तसेच आठवडी बाजारातुन चोरलेली मोटार सायकल त्याने तो राहत असलेल्या ईसापुर धरण येथील सरकारी कॉर्टर मध्ये ठेवली असल्याचे व उमरखेड येथुन चोरलेली मोटार सायकल हनवतखेडा पुसद येथील त्याचे नातेवाईकाचे कोठ्यात ठेवली असल्याचे सांगीतल्याने पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथकाने ईसापुर धरण व हनवतखेडा येथुन २ मोटार सायकल जप्त केल्या.
अशा प्रकारे पोलीस उपनिरीक्षक शेळके व त्यांचे पथकाने आरोपींकडून तीन मोटार सायकल एकुण किंमत १ लाख १० हजार रुपयाच्या जप्त करुन पुसद शहर पोलीस स्टेशन येथील दोन, उमरखेउ येथील एक असे एकुण तीन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असुन दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीकरीता पुसद शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नूरुल हसन, सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, मो. ताज, नागेश वास्टर सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.