
नात्याला काळिमा फासणारी घटना ,
अमीन शाह
मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. चार महिन्याच्या बाळासह मुलगी घरी एकटी असताना सावत्र बापाने छेड काढत अतिप्रसंग करत होता. त्यामुळे संतापलेल्या मुलीने बापाच्या गळ्यावर पाय देऊन खून केला.
नाशिक रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित आरोपी तरुणी स्वत: आपल्या पतीसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सुभाष चिंतामण बोराडे असं खून झालेल्या पित्याचं नाव आहे ,
आरोपी मुलीने आकाश शिंदे नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. लॉकडाउनच्या काळात हे जोडपं नाशिकमध्ये चार महिन्यापूर्वी राहण्यासाठी आलं होतं. त्यांना साडेचार महिन्यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी तरुणी आपल्या पती आणि मुलासह खून झालेल्या सुभाष चिंतामण बोराडे यांच्या घरी राहण्यास आले होते.
मुलगी आपल्या चार महिन्याच्या बाळासह घरी एकटीच होती. त्यावेळी मृत सुभाष बोराडेने आपल्याच मुलीची छेड काढली आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने प्रतिकार केला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत पित्याला दुखापत झाली आणि तो खाली कोसळला. त्यानंतर मुलीने बापाच्या गळ्यावर जोरात पाय दिला, त्यामुळे श्वास कोंडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










































