Home बुलडाणा कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकांची निवड मुलाखत घेऊन करावी..धर्मराज खिल्लारे

कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकांची निवड मुलाखत घेऊन करावी..धर्मराज खिल्लारे

210

रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा – मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य वगळून कुणीही प्रशासक होऊ शकतात शासनाच्या या सुधारित आदेशाने आता गावचे कारभारी असणारे नाराज झाले आहेत.गाव चालविणारे कारभारी नाराज झाल्याचे चित्र दिसुन येणार आहे एवड मात्र खर. प्रशासक म्हणून आपणच असू ,या आशेवरही पाणी फिरले आहे.कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकांची निवड मुलाखत घेऊन करावी.

सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वगळून गावातील कोणतीही अनुभवी व प्रशासन हाताळणारी व्यक्ती निवडावी, असे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. पालकमंत्रीच प्रशासक पदाची व्यक्ती निवडतील असेही नमूद करण्यात आले आहे.ग्रामपंचायत निवडणूकीला न पॅनलच्या खर्च न पैशाची उधळण न सदस्य पळून जाण्याची भितीही नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरनिवडणूक घेणे शक्य नसल्याने असे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे.मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांची निवड व्हावी अशी मागणी सरपंच परिषदेकडूनही करण्यात आली आहे. दरम्यान मागील आठवड्यात पालकमंत्री योग्य व्यक्ती प्रशासक म्हणून निवडतील असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहे.प्रशासनक या पदासाठी कोणतेही आरक्षण नाही. केवळ प्रशासकीय अनुभव या एकमेव निकषावर ही निवड होणार असल्याने पोलीस पाटील हेच सध्या प्रशासक पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकांची निवड मुलाखत घेऊन करण्यात यावी करीता काल तहसील कार्यालयामार्फत जिल्हापरिषद CO व मा. जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे.