आंतरराष्ट्रीय

रशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा

Advertisements
Advertisements

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या जगासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाने कोरोनाविरुद्धच्या लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. रशियाच्या सेचोनोव युनिव्हर्सिटीने हा दावा केला आहे. या लसीची मानवी चाचणीही यशस्वी झाल्याचं युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे.

कोरोनाविरुद्धची लस बनवण्यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लसींच्या चाचण्या सुरू आहेत. यामध्ये अनेक देशांना अपयश आलं आहे. पण रशियाने मात्र आपण कोरोनाविरुद्धची लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला आहे.

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन ऍण्ड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार युनिव्हर्सिटीने १८ जूनला गेमली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी ऍण्ड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या लसीचं परीक्षण सुरू केलं. सेचोनोव युनिव्हर्सिटीने पहिल्या लसीचं स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या परीक्षण केलं आहे.

सेचोनोव युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल ऍण्ड वेक्टर-बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव म्हणाले, आम्ही कोरोनाच्या लसीवर काम सुरू केलं आहे. चाचण्यांमधल्या स्वयंसेवकांच्या दुसऱ्या समुहाला २० जुलै रोजी डिस्चार्ज दिला जाईल.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

तळेगांव आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी, प्रशासनाच्या आदेशाला झुगारून जबरदस्तीने भरविला बाजार

पोलिसांनी पार पाडली फक्त बघ्याची भूमिका तर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गर्दी जमवत भरला बाजार   ...
जळगाव

अमळनेर येथील आवाज फाउंडेशन तर्फे माणुसकी धर्माचे पालन

कोरोना बाधित रुग्णांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम युवकांचा पुढाकार रावेर (शरीफ शेख) जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हात 90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर “दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु”

जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन ...