
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
ठाणे – ठाण्याचे संवेदनशील पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांनी शरणपूर वृद्धाश्रमास १० हजार०१ रुपयांची मदत करून या वृद्धाश्रमास मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वीची मदत या वृद्धाश्रमास आतापर्यंत आस्था फौंडेशन, औरंगाबादचे श्री गिरीश हंसराज ३ हजार रुपये, डॉ. नरेंद्र वैद्य, औरंगाबाद २ हजार रुपये, श्री कालिका कन्स्ट्रक्शन, पुणेचे श्री रवींद्र लाळे २१०० रुपये, श्री रवींद्र मनकीकर सर,औरंगाबाद १५०० रुपये, मलेशियातील श्री प्रशांत टांकसाळे ५ हजार रुपये, जळगाव येथील श्री पी बी पाटील २१०० रुपये, नवी मुंबई येथील रचना ठाकरे २००१ रुपये , नाशिक येथील सौ सोनल नितीन कदम ५०० रुपये, युको बँक,मुंबईचे अधिकारी श्री गोपीनाथ तुळसनकर, ५ हजार रुपये, पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, मुंबई, ५ हजार रुपये, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,मुंबई, २७००,युको बॅंकेचे निवृत्त सहायक सर व्यवस्थापक श्री वामनराव सातनूरकर, नागपूर २५०० रुपये, सौ आशाताई अशोकराव कुंदप, सातारा, १५०० (नुकत्याच दिवंगत झालेल्या त्यांच्या आई श्रीमती सुभद्राबाई शंकरराव इंदापुरे यांच्या स्मरणार्थ ) श्रीमती मोहिनी सुभाष तंटक,सातारा १५००, लेखिका रश्मी हेडे २ हजार रुपये , निवृत्त एस टी अधिकारी श्री लक्ष्मीकांत विभूते, नवी मुंबई,१ हजार, पत्रकार सविता कोल्हे,नाशिक ५००/- रुपये या प्रमाणे मदत केली आहे. या सर्वांनी मदत करून या वृद्धाश्रमास नव संजीवनी मिळवून दिली, याबद्दल वृद्धाश्रमाचे संचालक रावसाहेब मगर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. निवासी वृद्धांकडून एकही पैसा न घेता पूर्णपणे सेवाभावी वृत्तीने चालविण्यात येणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील या शरणपूर वृध्दाश्रमात १६ वृद्ध व ४ कर्मचारी असे २० जण आहेत. कोरोनामुळे सध्या लॉक डॉउन सुरू आहे.
त्याचा परिणाम वृद्धाश्रमावर झाला असून त्यांची किराणा मालाची व अन्न धान्याची अतिशय अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे या वृद्धाश्रमास मदत करावी , असे आवाहन करण्यात आले आहे. रावसाहेब मगर त्यांच्या पत्नी व सहकारी येथील वृद्धांची अतिशय आत्मीयतेने देखभाल करत असतात. आपण आपली यथाशक्ती मदत पुढील बँक खात्यात जमा करू शकता. अक्षय ग्रामीण युवा व क्रिडा व सामाजिक विकास संस्था, मक्तापूर,ता- नेवासा, जिल्हा-अहमदनगर, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-नेवासा,
खाते क्रमांक:60070064850.IFSC code- MAHB0000147. रावसाहेब मगर यांचा मोबाईल क्रमांक :7775015063. – देवेंद्र भुजबळ :9869484800.










































