August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन अटक करा

—————————————-
आंबेडकरी साहित्य अकादमीची मागणी
विशेष प्रतिनिधी
मेहकर
ज्या राज्याची विचारधारा शाहू,फुले, आंबेडकर ह्यांच्या विचारांची देणं आहे, जो महाराष्ट्र सातत्याने पुरोगामी विचारसरणीचा पाठीराखा म्हणून ओळ्खल्या जातो,आणि ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शत्रूच्या सुद्धा कबरी बांधत आणि त्या शत्रूंना मरणोत्तर सन्मान देत,त्या महाराष्ट्रात संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या आणि करोडो लोकांचे प्रेरनास्थळ असलेल्या राजगृहावर भ्याड हल्ला होतो त्याचा तीव्र निषेध व्यक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह ह्या निवासस्थान,वाचनालय व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञात समाजकंटक यांना तात्काळ शोधून अटक करावी,त्यांना कडक शासन करावे या मागणीचे निवेदन आंबेडकरी साहित्य अकादमी चया वतीने देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे जाणते मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून अज्ञात समाजकंटक यांना लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे
एसडीओ यांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आके आहे
नायब तहसीलदार परळीकर मॅडम यांनी या निवेदनाचा स्वीकार केला
या निवेदनावर आंबेडकरी साहित्य अकादमी चे अध्यक्ष सिद्धेश्वर पवार, यांचेसह संदीप गवई, किरण डोंगरदिवे, प्रा सुभाष मगर, न. ल. खंडारे, पा मा. गायकवाड, प्रा मेघराज शिंदे, गजानन डिगाबंर म्हस्के, प्रा वसंत गिरी, राजू मोहन शिंगणे,प्रा डॉ सुनील पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!