
योगयोगेश्वर संस्थान परीसरात विकल्या जाते अवैध दारु…..
देवानंद खिरकर := अकोट तालुक्यातील दहीहांड़ा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुळ जऊळका येथिल गजानन महाराज योगयोगेश्वर संस्थान परीसरात गावातील सुधीर घनबहादूर हा कुठलीही परमिशन नसतांना दररोज खुलेआम अवैध दारुची विक्री करित आहे.या बाबत पोलिसांना पुर्णपणे माहीती असुन सुध्दा कारवाई करण्यात येत नाही.गजानन महाराज यांचे पवित्र असलेले योगयोगेश्वर संस्थानचा या दारु विक्रीमुळे भंग होत आहे.येथे दारु पिणारे हे दादागीरी करत अश्लील भाषेचा वापर करतात यामूळे येथे विनाकारण वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यामूळे वरिस्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेवून योगयोगेश्वर संस्थान समोर सुरु असलेली अवैध दारुची विक्री थांबवावी व कडक कारवाई करावी.अशी मागणी योगयोगेश्वर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.
बाईट := गजानन महाराज मंदिर योगयोगेश्वर संस्थान वरुळ जऊळका परीसरात गावातील सूधीर घनबहादूर हा अवैध रित्या दारु विकत आहे तरी यांच्यावर कडक कारवाई करावी.
ह.भ.प.गणेश महाराज शेटे (संस्थान अध्यक्ष) वरुळ जऊळका











































