Home नांदेड कोरोनातून १ रूग्ण बरा झाला व १६ व्यक्ती कोविड बाधित तर दोन...

कोरोनातून १ रूग्ण बरा झाला व १६ व्यक्ती कोविड बाधित तर दोन रूग्णांचा मृत्यू

103

नांदेड, दि. ७ ( राजेश एन भांगे ) – कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 335 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. मंगळवार 7 जुलै 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 53 अहवालापैकी 24 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन 16 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 458 एवढी झाली आहे.

आज धनगर टेकडी इतवारा बाजार येथील राहणाऱ्या 83 वर्षीय बाधित पुरुष व्यक्ती व बळीरामपुर येथे राहणाऱ्या 60 वर्षीय बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे. या दोन्ही बाधितावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरु होते. सदर दोन्ही बाधित व्यक्तीस उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामूळे आतापर्यत बाधित मृताची संख्या 22 एवढी झाली आहे.

नवीन बाधितांमध्ये चक्रधरनगर येथील 15,42,68 वर्षाचे 3 पुरुष व 10, 40 वर्षाच्या 2 महिला, गणेशनगर येथील 70 वर्षाची 1 महिला, देगलूरनाका लक्ष्मीनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, सिडको संभाजी चौक येथील 68 वर्षाचा 1 पुरुष , बळीरामपुर येथील 60 वर्षाची 1 पुरुष, चैतन्यनगर बीॲडसी कॉलनी येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, इतवारा बाजार धनगर टेकडी येथील 83 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली तालुक्यातील अरळी येथील 43 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली गांधीनगर येथील 38 वर्षाची 1 महिला व 52 वर्षाचा 1 पुरुष, मुदखेड बाजार गल्ली येथील 48 वर्षाचा 1 पुरुषाचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.

आतापर्यंत 458 बाधितांपैकी 335 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 101 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 16 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 9 महिला बाधित आणि 7 पुरुष बाधित यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात 101 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 42, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 40, तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित, जिल्हा रुग्णालय येथे 3 बाधित, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 6 बाधित तर हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तर नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 1 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 2 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 7 जुलै 2020 रोजी 337 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 376,

घेतलेले स्वॅब- 7 हजार 302,

निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 67,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 16,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 458,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 13,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,

मृत्यू संख्या- 22,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 335,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 101,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 337 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.