Home मुंबई सेवासदन धर्मादाय मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचा पराक्रम गरोदर महिलेला व आईस धक्के मारुन हाकलले...

सेवासदन धर्मादाय मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचा पराक्रम गरोदर महिलेला व आईस धक्के मारुन हाकलले , जीवितास धोका करून जास्त रक्कम आकारल्याबद्दल कायदेशीर कारवाई ची मागणी

274

मुंबई – रवि गवळी

कांदिवली पूर्व दामूनगर येथे धर्मादाय चे
सेवासदन मल्टीस्पेशलिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात नेहमीच गरीब लोकांना लुबाडण्याचा प्रकार चालू असतो. या संदर्भात बरेच लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. अशाप्रकारे गरोदर महिला वंदना मस्के ही नित्यनेमाने या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेत होती परंतु दिनांक 11 जून रोजी या महिलेची प्रसूतीची वेळ जवळ आली असता सदर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या महिलेवर उपचार करण्यास मनाई केली व रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईकांना घाबरवून टाकले व तिच्या घरच्यांना आत्ताच्या आत्ता 40 हजार रुपये जमा करा तरच मी उपचार करेल असे म्हणत बाळ बाळातीन यांच्या जीवास धोका निर्माण केला व नातेवाईकांना घाबरून टाकले, अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना हाकलून लावले.त्यानंतर कांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय याठिकाणी या महिलेची अवघ्या अर्ध्या तासात सामान्य प्रसूती झाली. गरीब मागासवर्गीय लोकांना धाक दाखवणे त्यांची लुबाडणूक करणे त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळणे असे प्रकार या रुग्णालयात नेहमीच होत असतात याची चौकशी करून करून सेवासदन रुग्णालय व संबंधित डॉक्टर यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवावा व रुग्णालयाचा भोंगळ कारभार बंद व्हावा व यांची चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सेक्रेटरी व लोकनायक सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुग्णमित्र संजय बोर्डे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल.मान उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मान राजेश टोपे साहेब
आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल , जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, आर दक्षिण मनपा , मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे याना करण्यात आली आहे.