August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट च्या माध्यमातून कार्यकारी संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी केले दीड लाख आसेनीक अलबम गोळ्यांचे वाटप ,

नजाकत सय्यद

बदनापूर /प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे देश हादरून गेलेला आहे अश्या कठीण परिस्थतीमध्ये अनेक दानशूर व समाजसेवक पुढे येऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असून बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट च्या माध्यमातून कार्यकारी संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी आपणास समाजाचे काही देणे लागते या हेतूने पुढे येऊन त्यांनी माणसांच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आसेनिक अल्बम च्या दीड लाख गोळ्या च्या बॉटल बनविल्या आहेत,सदर गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे या गोळ्यांचे वाटप सलग २७ दिवसापासून १२७ गावात करण्यात आले असून नागरिकांना गोळ्या सेवन करण्याची पद्धत देखील व्यवस्थित समजून सांगण्याचे काम केले
बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट चे कार्यकारी संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या गरजू लोकांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आसेनिक अल्बम गोळ्या बनविल्या आहेत ,सदर गोळ्या बाजारात खूप जास्त किमतीने विकल्या जातात ,आसेनिक अल्बम ह्या गोळ्या कोरोना रोगाच्या नसल्या तरी या गोळ्यामुळे माणसांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे काही प्रमाणात कोरोना रोगापासून बचाव होतो,बाजारात किमती जास्त असल्याने सामान्य गोर गरीब यांना गोळ्या खरेदी करणे शक्य नसल्याने डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी गरजूना मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन १ लाख ५० हजार आठ बॉटल बनविले आहे, बदनापूर तालुक्यासह लगतच्या तालुक्यातही होमियोपॅथिक गोळ्यांचे वाटप मागील २७ दिवासापासून सुरू आहे. पाथ्रीकर कँपसमधील सुसज्ज अशा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रयोगशाळेत डी. फार्मसी. व बी. फार्मसी. मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दीड लक्ष बॉटलची निर्मिती करून सात पथकामार्फत हे वाटप घरोघरी सुरू केलेले होते.
दरम्यान बदनापूर येथील ट्विनकल स्टार स्कुल येथेही एक काउंटर उघडून येथे येणाऱ्यांनाही गोळ्या वाटप करण्यात येत होत्या सतत २७ दिवस बहुतांश गावात या गोळ्यांचे वाटप डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या वतीने करण्यात आले. या २७ दिवसात जवळपास १२७ गावातील घराघरात जाऊन जवळपास 1 लक्ष ५० हजार बॉटल औषधी मोफत वितरित करण्यात आली. या सामाजिक कार्यात सुनील जायभाये,कल्याण देवकाते,योगीराज मुळे,स्न्हेह्ल गोरेगावकर,निवृत्ती पंडित,अविनाश हटकर,आनंद सांभळे,जनार्धन घुगे,सुजित बुरसे,अंकुश कोलते,चेतन मिरखे,मनोज गजर ,संभाजी नाईकवाडे,दिनेश आडे,दर्शन व्यवहारे,वैभव मगरे,ओंकार कुलकर्णी,धूत सौरभ,गुरु चाटे,दीपक पोपळे,अर्जुन हिवरे,अभय अवघड,जोशी विशाल,अक्षय कान्हेरे यांनी सहकार्य केले
====================
डॉ.देवेश पाथ्रीकर-कार्यकारी संचालक
कोरोना महामारीमुळे मोठे संकट आपल्यासमोर उभे आहेत शासन व प्रशासन आपल्या परीने कोरोना रोगावर मात करण्यासाठी आहोरात्र परिश्रम घेत असून पोलीस,आरोग्य विभागासह पत्रकार देखील जनजागृतीचे काम करीत आहे,कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती आवश्यक असल्याने आसेनिक अल्बम च्या गोळ्या महत्वपूर्ण आहे आणि सदर गोळ्या बाजारातून गोर गरिबांना खरेदी करणे शक्य नाही अश्या परिस्थितीत मध्ये समाजासाठी काही तरी करावे या उद्देशाने आम्ही १ लाख ५० हजार गोळ्याचे बॉटल वाटप केले

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!