Home विदर्भ पिंपरी मोडक येथील नंदकिशोर चव्हाण वय 42 हे लाडेगाव शेतशिवारात रानडुकराच्या हल्ल्यात...

पिंपरी मोडक येथील नंदकिशोर चव्हाण वय 42 हे लाडेगाव शेतशिवारात रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी

108

लाडेगाव येथील युवकाचा धाडसी पराक्रम

आरिफ पोपटे – कारंजा

वाशिम – तालुक्यातील पिंपरी मोड़क येथील शेतकरी नंदकिशोर चव्हाण शेतीचा कामाकरिता लाडेगाव शिवारातून जात असताना त्यांच्यावर रानडुकरांनी प्राणघातक हल्ला केला आहे या हल्ल्यात नंदु चव्हाण गंभीररीत्या जखमी झाले आहे त्यांना प्राथमिक उपचाराकरिता जिल्हा ग्रामीण रुग्णालय कामरगाव येथे आणण्यात आले आहे आज सकाळी ठीक 8 वाजता नंदकुमार चव्हाण हे पिंपरी येथून लाडेगाव शिवारात जात असताना त्यांच्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केला ही बाब त्यांच्या मागून येणारे सचिन सिद्गुर लाडेगाव, येथील युवकांना आढळल्यावर त्यांनी काठीच्या साह्याने रानडुकरा वर प्रतिहल्ला चढवला व नंदु चव्हाण यांची सुटका केली पुढील उपचाराकरता सचिन सिदगुर स्वतःच्या गाडीवर त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे पोचले व पुढील उपचार सुरू आहे.
अशा प्रकारचे शेतकऱ्यावर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्याकरिता वनविभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.