Home बुलडाणा खदान वर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३ मुलींपैकी दोघींचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून...

खदान वर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३ मुलींपैकी दोघींचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू

161

अमीन शाह

बुलडाणा – मलकापूर येथील उघडा मारूती मंदिर जवळच असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिन मुलींपैकी एकीचा पाय घसरल्याने पाण्यात बुडाली.

तर दोघींनी आपली मैत्रीण डुबत असल्याचे बघुन मैत्रीनीला वाचविण्याचा प्रयत्न करित असतांना दोघींचा ही तोल जाऊन पाण्यात पडल्याचे पाहताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेतल्याने एकीला वाचविण्यात यश आले मात्र दोघींना जलसामाधी मिळाल्याने घोघींचा मृत्यू झाला. तर मृत्यू झालेल्या मुलींमध्ये बाजुलाच असलेल्या म्हाडा काॅलनीतील रहिवासी कांचन बामंदे वय 14 वर्ष व शुभांगी दुतोंडे वय 10 वर्ष या दोन मुलींचा मृत्यू झाला असून नेहा वानखडे वय 12 वर्ष याला नागरिकांना वाचविण्यास यश आले आहे.याघटनेची माहिती मिळताच शहर पोलीसांची तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन एपीआय श्रीधर गुट्टे यांनी खदानमध्ये सर्च ऑपरेशन राबवुन दोन्ही मृतक मुलींचे शव तेथील युवकाच्या मदतीने बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले आहे.
यावेळी एपीआय श्रीधर गुट्टे, समाधान ठाकूर, ईश्वर वाघ, रतन बोराखडे, कर्मचारी होते त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास नागरे घटनास्थळी दाखल झाले असुन मृतक मुलींचे शव हे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असुन पुढील कारवाई सुरू आहे.