August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

जमात ए इस्लामी हिंद यवतमाळ न. प. यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नागपूर मार्गावर आरटीओ कार्यालयासमोर दुभाजकामध्ये वृक्षारोपण करीत दिली ट्री गार्ड ची सुरक्षा….!!

जनसहकार्याने करणार वृक्ष संवर्धन…..!!!

यवतमाळ – 2 :- जमात-ए-इस्लामी यवतमाळ व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने नागपूर रोड आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षलागवड व संवर्धनासाठी जमाते इस्लामी हिंद कडून नियोजन करण्यात आले आहे . विशेष म्हणजे जमात कडून आकर्षक व मजबूत असे 20 ट्री गार्ड व त्याच्यात पौधे रोपण्याची व्यवस्था करण्यात आली.आज सकाळी झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी जमात ए इस्लामी हिंद चे अमीर ए मकामी जियाउद्दीन साहेब,यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा,नगरसेवक जावेद अन्सारी,नगरसेवक सलीम शाह सागवान,नगरसेवक अमोल देशमुख,नगरसेवक शहजाद शाह सागवान,डॉ विजय अग्रवाल,जमात चे सेक्रेटरी सैयद शहाबुद्दीन,रियाज सर,काजी निजाम,अयाज खान,आदी हजर होते,जमात कडून मान्यवरणांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत त्यांच्या हस्ते रोड डीवायडर मध्ये वृक्षारोपण करून आकर्षक अश्या ट्री गार्डची सुरक्षा देण्यात आली.

वृक्ष लागवड करण्याची शहरातील नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी वृक्षारोपण करीत ट्री गार्ड वर हजरत मोहम्मद पैगंम्बर यांच्या हदीसनुसार संदेश नमूद करण्यात आले आहे की “जर प्रलय येत असताना तुमच्या हातात पौधा आहे आणि तुम्हाला एवढा वेळ मिळत आहे की तुम्ही तो पौधा रोवू शकता तर तुम्ही ते जरूर रोवून टाका”.

पर्यावरण संतूलन ठेवण्यासाठी वृक्षांची लागवड व त्यांचा संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे.विश्वात जगणाऱ्या मानव जातीला व सर्व प्राण्यांना ऑक्सिजन वृक्षापासूनच मिळते,आज विकासाच्या नावाने वृक्षांची कत्तल केली जात आहे,त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडल्याने शहरात शुद्ध हवा मिळणे कठीण बनले आहे.शहरात वृक्ष लागवडाची गरज लक्षात घेता जमात ए इस्लामी यवतमाळ ने पुढाकार घेऊन वृक्ष लागवड अभियान सुरू केले असून,आपल्या आप्तस्वकीय व मित्र परिवारातील लोकांना निमंत्रित करून त्यांना पौधा भेट देत वृक्षांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!