Home बुलडाणा बलात्कार आणि ऐट्रोसिटी ची धमकी देऊन 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक...

बलात्कार आणि ऐट्रोसिटी ची धमकी देऊन 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक ,

234

देऊलगावराजा येथील घटना ,

अमीन शाह

देऊलगावराजा , एक महिला सोबत नको त्या अवस्थेत विडिओ घेऊन तो वायरल करण्याची व ऐट्रोसिटी करण्याची धमकी देऊन 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज देऊलगावराजा बाय पास वर मोठ्या शिताफीने रंगेहाथ गजाआड केले आहे या घटने मूळे शहरात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहिती नुसार यातील तक्रारदार याची ओळख सोशल मीडिया च्या माध्यमातून जालना येथील एका महिलेशी झाली होती सुरवातीला या महिलेने मला तुमच्या शहरात ब्युटी पार्लर सुरू करायचा आहे मला भाड्याने जागा घेऊन द्या असे सांगितले त्यावर फिर्यादी याने मी प्लाटिंग चा वायसाय करतो असे सांगितले त्या नंतर या महिलेने सोशल मीडिया च्या माध्यमातून या महिलेशी संपर्क वाढवला व एक दिवस या महिलेने आपले मित्र राहुल गाडेकर , भिवंगाव , सचिन बोर्डे रा , जालना यांना हाताशी पकडून फिर्यादी राजेंद्र सोबत एक व्हिडिओ क्लिप बनवली व ही विडिओ क्लिप वायरल करण्याची व जबरदस्ती करण्याची धमकी देऊन फिर्यादी यास 25 लाख रुपयांची खंडणी मागितली यावर फिर्यादी यास शनका आल्याने त्याने गुन्हे शाखे कडे तक्रार दिली पोलिसांनी आज देऊळगाव राजा बायपास वर सापळा रचून खंडणी च्या रकमे तुन 4 लाख रुपये स्वीकारताना तिघांना मोठ्या शिताफीने अटक केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे