Home राष्ट्रीय भारत-चीन मधील वाढता तणाव पाहता मोदी सरकारने केला चीनवर मोठा प्रहार –...

भारत-चीन मधील वाढता तणाव पाहता मोदी सरकारने केला चीनवर मोठा प्रहार – केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App ला केले बॕन

164

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

नवी दिल्ली – केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे. सरकारने अनेक लोकप्रिय चीनी अॅपवर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने हे पाऊल उचललं आहे. भारत-चीनमध्ये तणाव असताना मोदी सरकारने चीनवर हा एकप्रकारचा मोठा प्रहार केला आहे.

भारत-चीन वादानंतर भारतातून या अॅपवर बंदी घालण्याची मागणी वाढली होती. चिनी App वर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर देखील जोरदार मागणी होत होती. अखेर आज सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे.

आयटी अॅक्टच्या 69 ए नुसार सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यावर बंदी घातली आहे.

सरकारने खालील मोबाईल App वर बंदी घातली आहे.

१. टिकटॉक (TikTok)
२. शेअर इट (Share it)
३. क्वाई (Kwai)
४. यूसी ब्राउझर (UC Browser)
५. बैदु नकाशा (Baidu map)
६. शीन (Shein)
७. क्लॅश ऑफ किंग्ज (Clash of Kings)
८. डीयू बॅटरी सेव्हर (DU battery saver)
९. हेलो (Helo)
१०. लाइक (Likee)
११. यूकॅम मेकअप (YouCam makeup)
१२. मी समुदाय (Mi Community)
१३. सीएम ब्राउझर (CM Browers)
१४. व्हायरस क्लिनर (Virus Cleaner)
१५. एपीयूएस ब्राउझर (APUS Browser)
१६. रॉमवे (ROMWE)
१७. क्लब फॅक्टरी (Club Factory)
१८. न्यूजडॉग (Newsdog)
१९. ब्यूट्री प्लस (Beutry Plus)
२०. वी चॅट (WeChat)
२१. यूसी न्यूज (UC News)
२२. क्यूक्यू मेल (QQ Mail)
२३. वेइबो (Weibo)
२४. झेंडर (Xender)
२५. क्यूक्यू म्यूझिक (QQ Music)
२६. क्यूक्यू न्यूजफीड (QQ Newsfeed)
२७. बिगो लाइव्ह (Bigo Live)
२८. सेल्फीसिटी (SelfieCity)
२९. मेल मास्टर (Mail Master)
३०. पॅरालल स्पेस (Parallel Space)
३१. मी व्हिडिओ कॉल – शाओमी (Mi Video Call – Xiaomi)
३२. वी सिंक (WeSync)
३३. ईएस फाइल एक्सप्लोरर (ES File Explorer)
३४. व्हिवा व्हिडिओ – क्यू व्हिडिओ इंक (Viva Video – QU Video Inc)
३५. मीटू (Meitu)
३६. विगो व्हिडिओ (Vigo Video)
३७. न्यू व्हिडिओ स्टेटस (New Video Status)
३८. डीयू रेकॉर्डर (DU Recorder)
३९. व्हॉल्ट – हाईड (Vault- Hide)
४०. कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ (Cache Cleaner DU App studio)
४१. डीयू क्लिनर (DU Cleaner)
४२. डीयू ब्राउझर (DU Browser)
४३. हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स (Hago Play With New Friends)
४४. कॅम स्कॅनर (Cam Scanner)
४५. क्लीन मास्टर – चित्ता मोबाइल (Clean Master – Cheetah Mobile)
४६. वंडर कॅमेरा (Wonder Camera)
४७. फोटो वंडर (Photo Wonder)
४८. क्यूक्यू प्लेयर (QQ Player)
४९. वी मीट (We Meet)
५०. स्वीट सेल्फी (Sweet Selfie)
५१. बैदु ट्रान्सलेट (Baidu Translate)
५२. व्ही मेट (Vmate)
५३. क्यूक्यू इंटरनॅशन (QQ International)
५४. क्यूक्यू सिक्युरिटी सेंटर (QQ Security Center)
५५. क्यूक्यू लाँचर (QQ Launcher)
५६. यू व्हिडिओ (U Video)
५७. व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ (V fly Status Video)
५८. मोबाइल लिजेंड्स (Mobile Legends)
५९. डीयू प्रायव्हसी (DU Privacy).