Home विदर्भ पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा पासून ग्राहक वंचित

पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा पासून ग्राहक वंचित

59
0

पुरुषोत्तम कामठे

यवतमाळ , दि. 03 :- पेट्रोल पंपावर ग्राहकांना किमान 9 प्रकारच्या निशुल्क सेवा मिळायला पाहिजे परंतु यवतमाळ मधील पेट्रोल पंपावर या सुविधा मिळत नसून या सुविधानपासून ग्राहक वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्या नंतर ग्राहकला गाडीच्या टायर मध्ये हवा निशुल्क भरून मिळायला पाहिजे परंतु यवतमाळ मधील पेट्रोल पंपावर हवा भरण्याची मशीन फ़क्त देखाव्यासाठी ठेवलेल्या आहे. तसेच शौचालय हे साफ़सूत्रे असणे हे अतिशय आवश्यक आहे.पेट्रोल पंपावर फोन करण्याची सुविधा असणे ही आवश्यक आहे.आणि महत्वाचे म्हणजे फस्ट एड बॉक्स ज्या मधे असणाऱ्या औषधी या नविन असून एक्सपायर झालेल्या नसायला पाहिजे पेट्रोल पंपावर कंपनीचे नाव व संचालकाचे नाव व संचाकाचा नंबर असलेले बोर्ड लटकवलेले असणे ही आवश्यक आहे.

पेट्रोल पंप सुरु व बंद चे वेळापत्रक सुट्टीच्या दिवसांची माहिती व एखाद्या ग्राहकाला तक्रार करायची असल्यास पेट्रोल पंपावर तक्रार पेटी असणे अति आवश्यक आहे. अश्या या सुविधा पासून यवतमाळ मधील ग्राहक वंचित आहे पेट्रोल पंप धारक फ़क्त ग्राहकांकडून पेट्रोल भरन्याचे पैसे घेण्याचे काम करीत आहे , आणि ग्राहकाला अर्धवट सुविधा देत आहे. सोबतच ग्राहकाला पूर्ण पेट्रोल मिळत नसल्याचे दिसून आलेले आहे. पेट्रोल भरते वेळेस कधी 50 पैश्याचे तर कधी 30 पैश्याचे पेट्रोल प्रतेक ग्राहकाला कमी टाकल्या जातात पेट्रोल पम्पावर होणाऱ्या या फसवणुकी पासून ग्राहक परेशान झालेले आहे. काहि मटल्यास पेट्रोल भरणार कर्मचारी आरेरावि वर उतरत असल्याचेही आढडून आले पेट्रोल पम्पावर भेदभाव सुद्धा केल्या जातात प्रतेक पेट्रोल पम्पावर पाहायला मिळतात की पेट्रोल डिझेल भरायला आलेल्या कार मधून कार चालक किंवा धारक हे कार मधून खाली न उतरता कर्मचार्याचा हातात चाबी देतात व कर्मचारी टाकीचे झाकन उघडून पेट्रोल/डिझेल भरतात आणि आणि टाकीचे झाकन लाउन चाबी चालकास नेउन देतात कार धारक जासतीत जास्त 20 ते 30 लीटर ची भरना करीत असेल परंतु लोडिंग गाडीचे धारक / चालक हे शेकडो लीटर ची भरना करतात परंतु त्यांना तीळ भर्याचाहि मान सम्मान दिल्याजात नाही पेट्रोल पम्प वरील कर्मचाऱ्यांच्या भेदभाव हां अतिशय लाजिरवाना असून पेट्रोल पम्प धारक कुठलीही दखल घेत नाही पेट्रोल पम्पावरील हे प्रकार खुप गंभीर असून शासनाने या प्रकारावर कड़क कार्यवाही करायला पाहिजे परंतु शासनाचे कित्तेक अधिकारी आणि कर्मचारी या फसवणुकीचे शिकार झालेले आहे.

यावरुन दिसून येत आहे की शासन किती प्रमाणात झोपी गेलेले आहे.