Home विदर्भ महावितरण च्या वीज बिलाची होळी

महावितरण च्या वीज बिलाची होळी

299

प्रशांत नाईकअमरावती – जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे येथे शिवाजी चौकात युवा नेता बाबा ठाकूर यांच्या नेतृत्वात महावितरण ने दिलेल्या अवाढव्य वीज बिलाची होळी करण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीने कोरोना संपण्याच्या आधीच शेतकरी , शेतमजूर , व्यावसायिकांना 420 व्होल्ट चा झटका देऊन सर्वांचे कमरडे मोडले आहे.
बेरोजगार झालेला मजूर वर्ग, शेतकरी, व्यवसाय ठप्प झालेला व्यापारी, इतके वीज बिल कसे भरणार याचे निकष करून शेतकरी, शेतमजुरांना वीज बिल माफ करावे, व व्यावसायिकांना वीज बिलातील सर्व कर माफ करावे अन्यथा यापेक्षा जास्त त्रीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक युवा नेते बाबा ठाकूर यांनी दिला आहे.
यावेळी नगरसेवक संजय जांगडा, राजु गायकवाड, हरीश पंनपालिया, राजु कारलेकर, विशाल गांधी, प्रशांत मोरे, अनिल गौडबोले, गणेश ठाकूर,प्रशांत पवार, बल्लू मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते .