Home जळगाव खिर्डी बुद्रुक येथील वार्ड नंबर 4 मधील झालेल्या कांक्रीटीकरण च्या कामाची चौकशी...

खिर्डी बुद्रुक येथील वार्ड नंबर 4 मधील झालेल्या कांक्रीटीकरण च्या कामाची चौकशी व्हावी….

251

सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे यांची मागणी….!

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील खिर्डी बु।येथे वार्ड क्र 4 मध्ये 14 व्या वित्त आयोग अंतर्गत काँक्रीटीकर्णाचे काम झालेले आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीचे झालेले आहे.जसे की estimate मध्ये खोदकाम करून व कठीण व मऊ मुर्माचा थर देऊन rubble च्या माला द्वारें रस्त्याची समान लेव्हल करणे अपेक्षित होते व खोदकाम करून काँक्रीटच्या सी सी 1:4:8 व 0:75 मी जाडीचा थर देण्यात यावा तसेच काँक्रीटचा पण थर देण्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेला आहे परंतु त्याप्रमाणे काम झाले नाही . त्याच प्रमाणे कॉलिटी कंट्रोल ची तरतूद असून त्या संबंधी काही एक माहिती न देता विषयाला चालढकल करीत आहे या प्रकरणात भ्रष्टचार निदर्शनास येत आहे. तरी त्या संबधी चे काम व कामाची योग्यता कॉलिटी सुधारण्यात यावी असा अर्ज दि.19.6.20 रोजी ग्रामविकास अधिकारी / सरपंच यांना सादर करून तसेच प्रभारी गटविकास अधिकारी मा. तडवी साहेब यांना सुध्दा याबाबत फोन करून माहिती दिली होती अर्ज पण दिलेला असून दोन दिवस होऊन सुध्दा कुठलीच चौकशी अथवा कार्यवाही केलेली नाही.त्या संबंधी ग्रामविकास अधिकारी यांना विचारले असता ते सर्व ठरल्याप्रमाणे होत आहे व अधिकची सर्व माहिती अभियंता व वरिष्ठ अधिकारी देतील अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधि शी बोलतांना दिली.

काँक्रीटीकर्णाचे हे मोठया प्रमाणात निकृष्ठ पध्दतीचे झालेले आहे.तसेच निकृष्ठ पद्धतीचे काम करून शासनाचा पैसा मोठया प्रमाणात लाटण्याचे काम होत आहे आमचे प्रतिनिधी नि अभियंता शी पंचायत समिती त जाऊन भेटण्याचा पर्यंत केला पण तेथ भेटले नसून कॉल वर संपर्क करण्याचा प्रयन्त केला परंतु त्यांचाशी कसल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही .त्यामुळे सदरील कामाची योग्य ती चौकशी करण्यात यावी व चौकशी अहवाल मिळावा व चौकशी होईस्तोवर कुठल्याही प्रकारचे संबंधित ठेकेदाराला कामाचे बिल पास करू नये व शासकीय पैसाचे विणाकरण हानी होऊ नये म्हणून लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे यांनी केलेली आहे.