Home विदर्भ मंगरूळच्या महेंद्र कृषी केंद्रातून बोगस बियाण्यांची विक्री….!

मंगरूळच्या महेंद्र कृषी केंद्रातून बोगस बियाण्यांची विक्री….!

241

बियाणे ऊगवलेच नाही….!

@दुबार पेरणीचे संकट

@मुळ किंमतीवर खाडाखोड

@जिल्हाधीकार्यांकडे तक्रार

@शेतकरी हतबल

यवतमाळ – तालुक्यातील मंगरूळ (साखर कारखाना ) येथील महेंद्र कृषी केंद्रातून बोगस बियाण्यांची विक्री केली जात आहे. अनेक कंपन्या चे सोयाबीन बियाणे वांझ निघाले आहे. पेरणी केल्यानंतर एकही अंकुर जमिनीवर न आल्याने शेतकरी रामेश्वर कनिराम चव्हाण हतबल झाले आहे. संजय ज्ञानेश्वर जिल्हेवार यांचे महेंद्र कृषी केंद्रातून महाबिज आणि तिरुपती कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. परंतु सदरील बियाणे बोगस आणि वांझ असल्याने ऊगवलेच नाही. त्यामुळे शेतकर्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. शिवाय सोयाबीन च्या पिशवीवर मुद्रीत मुळ किंमती वर खोडताड करुन मार्कर पेनने मनमानी पणे किंमत टाकुन परिसरातील शेतकर्यांना लुटले आहे. दुबार पेरणीचे संकट मानगुटीवर बसल्याने शेतकर्याचा संपुर्ण प्रचंड दडपणाखाली आला आहे. बोगस बियाणे विकुन शेतकर्याच्या प्रेतावरील लोणी खाणार्या महेंद्र कृषी केंद्राचे संचालक संजय ज्ञानेश्वर जिल्हेवार याचेसह बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करुन, पेरणी केलेले बियाणे न ऊगवल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी. हवालदिल शेतकरी रामेश्वर कनिराम चव्हाण यांनी जिल्हाधीकारी यांचे कडे निवेदनातुन केली आहे. निवेदनाच्या प्रती, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पं.स.कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत. शेतकर्याने न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.