Home विदर्भ भारतीय जनता पार्टी मोर्शी शहर व ग्रामीणच्या वतीने मागणी…

भारतीय जनता पार्टी मोर्शी शहर व ग्रामीणच्या वतीने मागणी…

133

शेतक-यांना कर्जमाफी करा व पीककर्ज द्या…

आजपासून मोर्शी तालुक्यातील प्रत्येक बँकेसमोर निदर्शने….

मनिष गुडधे

अमरावती – पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, मोर्शी शहर व ग्रामीण आजपासून “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करणार आहे.

राज्यात कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारच्या ‘बांधावर खत आणि बियाणे’ या योजनेचा बोजवारा उडालेला आहे. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे भाजपाने आंदोलनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावी व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपाची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते मोर्शी तालुक्यातील प्रत्येक बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येईल. या आंदोलनात कोरोनाच्या साथीमुळे योग्य काळजी घेतली जाईल.

राज्यात लाखाच्यावर शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असून कापूस सडत आहे. त्यामुळे मजबुरीने व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत आहे. चणा खराब होण्याची वेळ आली तरी तरी खरेदी होत नाही. खरीप पिककर्ज नाही, कापसाचे, तुरीचे, चण्याचे पैसे आलेले नाही. बियाणे, खत, मजुरी भागवायची कशी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. दागिने गहाण ठेवून शेतकरी सावकाराकडे विनवणी करतो आहे.

भाजपाने फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन केले होते व त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

राज्यात शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था आजपर्यंत कधीही झाली नाही. तूर, चना, कापूस पडून आहे, कर्जमाफी कागदावरच आहे आणि पिककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार अपमान होत आहे, यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आपण केली. दोन लाखाच्या वरच्या कर्जासाठी ओटीएस लागू करु आणि नियमित कर्ज भरणाऱ्याना ५०,००० रु. प्रोत्साहनपर रक्कम देवू असे अर्थसंकल्पात जाहीर केले. प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही.

दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही आणि जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारने २२ मे रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही, याची कबुली देवून ‘शासनाच्या नावे कर्ज मांडावे,’ असे बँकांना सांगितले. बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली. दोन लाखाच्या वर कर्ज असणाऱ्यांसाठी ओटीएसचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्याच्या प्रोत्साहन अनुदानाचा आदेश निघाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या ‘कर्जवितरणाबाबत तक्रारी नकोत’ या इशाऱ्याला बँका जुमानत नाहीत.

दुर्दैवाने आपण केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करत नाहीत, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी कोरडवाहूला २५००० रु. फळबागांना ५०००० रुपयाची घोषणा सरकार विसरले. कोकणामध्ये आपद्ग्रस्तांची तातडीची मदत पोहोचलीच नाही. टोळधाळीच्या नुकसानीची दखलच घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारला जाग आणण्यासाठी आजपासून भारतीय जनता पार्टी मोर्शी तालुक्यातील प्रत्येक बँकेसमोर आंदोलन करणार आहे.त्यासाठी आज तहसीलदार मोर्शी यांना निवेदन देण्यात आले व निष्क्रिय आघाडी सरकार व आमदारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आले. यावेळी उपस्थिती
रवि मेटकर अध्यक्ष मोर्शी शहर,देवकुमार बुरंगे तालुका(ग्रामीण) अध्यक्ष,जि.प. सदस्य शरदभाऊ मोहोड़ ,जि.प. सदस्य संजयभाऊ घुलक्षे तसेच मोर्शी पं.स. सभापती यादवराव चोपड़े, पं.स. उपसभापती मायताई, वानखडे,शंकरराव उईके(माजी सभापती पं.स.मोर्शी),आप्पा साहेब गेडाम उपाध्यक्ष न.प.मोर्शी
तसेच नगरसेवक हर्षलभाऊ चौधरी, नितीनजी राऊत,सुनीलभाऊ ढोले,
मनोहरभाऊ शेंडे,
ब्रह्मनंदभाऊ देशमुख,सुनीताताई कोहळे महिला बालकल्याण सभापती,दिपकभाऊ नेवारे नगरसेवक,ज्योतीभाऊ मालवीय माजी नगरसेवक,कैलासभाऊ फंदे माजी नगरसेवक,निलेशभाऊ चौधरी माजी शहर अध्यक्ष मोर्शी,
अजिंक्य लुंगे भाजयुमो तालुकाध्यक्ष मोर्शी ग्रामीण व भाजयुमो शहराध्यक्ष आकाश ढोमणे,भाजपा सोशल मीडिया संयोजक बलराम द्विवेदी,
निलेशभाऊ शिरभाते सरचिटणीस भाजपा मोर्शी ग्रामीण,
मनीष इंगळे, इकबाल हुसेन, गौरव आखरे, सचिन गोमकाळे, विशाल चिंचोळकर, पावन घोरमळे, माया ताई बासुंदे, हर्षल माणिकपुरे, रावसाहेब अढाऊ, सुशील सुरोसे,सुशील धोटे व इतर अन्य लोकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला.