August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

महावितरण कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योध्याचे प्रोत्साहनपर पुष्पवृष्टी 

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत लॉकडाऊनच्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी मागील तीन महिन्यांपासून कर्तव्य बजावणाऱ्या महावितरण कर्मचारी कोरोना योध्यांचे मनोबल उंचावण्यासाठी अश्पाक मुल्ला आणि मित्र परिवाराच्या वतीने प्रोत्साहनपर पुष्पवृष्टी करण्यात आली.
अक्कलकोट उपविभागीय कार्यालया अंतर्गत शहर व ग्रामीण विभागातील आपल्या कार्यालयीन ठिकाणी आपले कर्तव्य बजावणारे महावितरण कर्मचारी या सर्वांच्या अमूल्य कार्याचे कौतुक करण्याच्या हेतूने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, अश्पाक मुल्ला आणि मित्र परिवार यांनी पुष्पवृष्टी केली.
या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमाबद्दल ग्रामीण भागतील शिरवळ येथील सहाय्यक अभियंता हर्षवर्धन पाटील, प्रविण माने पाटील वरिष्ठ तंत्रज्ञ, बाबुराव जाधव प्रमुख तंत्रज्ञ, गंगदे एस. ए. ऑपरेटर, रामलिंग अष्टगी ऑपरेटर, अमित जाधव वरिष्ठ तंत्रज्ञ, विनायक कांबळे, प्रमोद देवकर, बंडू मोरे, बसवराज स्वामी, नदाफ, मुजावर, कवचे, कोळी, कुंभार आदिंनी समाधान व्यक्त करत या पुष्पवृष्टीमुळे काम करायला नवा उत्साह व नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केले. शिरवळ गावचे तंटामुक्त अध्यक्ष अप्पासाहेब देवकर, उद्योगपती प्रशांत तानवडे, अप्पू निंबर्गी, नरेश बिराजदार, बाबुराव हळळुरे, दिपक तानवडे आदी जण उपस्थित होते.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!