Home महत्वाची बातमी मोर्शी शहरात गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम…!

मोर्शी शहरात गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम…!

137

मोर्शी – राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक मोर्शी व हिवताप कार्यालय उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांनी पावसाळ्याच्या दिवसात पसरणाऱ्या डेंगू,हिवताप,हत्तीरोग, चिकन गुनिया या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे व त्याचबरोबर पावसाळ्यातील साथरोग, कोरोनाबद्दल जनजागृती तसेच कंटेनर सर्वेक्षण,रक्त नमुने,व्हेन्ट पाईपला कापड बांधणी संपूर्ण मोर्शी शहरात राबविण्यात येत आहे ही मोहीम उपसंचालक डॉ.फारुखी सर,सहाय्यक संचालक डॉ.भंडारी सर (हिवताप व हत्तीरोग), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले सर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निकम सर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.हरिष कुंडे, सर जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर, व मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर सर, मोर्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे या मोहिमेत आरोग्य सहाय्यक विनायक नेवारे,विनय शेलुरे आरोग्य कर्मचारी प्रकाश मंगळे, सुधाकर कडू, प्रशांत बेहरे,राहुल भोसले, डी एम आरलवाड,राधाकिसन वैद्य,चंद्रसेन जाधव,मुरलीधर काळे,शरद रायबोले, अजय भागवत हे आहेत.