Home मराठवाडा गोपीचंद गडावरील गोशाळेत पहिल्या गाईचे स्वागत

गोपीचंद गडावरील गोशाळेत पहिल्या गाईचे स्वागत

41
0

परभणी / गंगाखेड- गोशाळा भूमिपूजनाच्या तिसऱ्याच दिवशी रविवारी आलेल्या गाईचे संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड येथे पूजा आरती करून स्वागत करण्यात आले.

गोपीचंद गडावर गोशाळा सुरू झाल्याचे कळताच सेलू ता. परळी जिल्हा बीड येथील लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्यांनी चारण्यासाठी चारा नसल्याने स्वतःकडील एक गाय व वासरू संत मोतीराम महाराज गोशाळेत सोडले. 14 जून रविवार रोजी दुपारी स्वतःच्या गाय वासराला घेऊन ते वडगाव स्टेशन मार्गे गोपीचंद गडावर दाखल झाले. गोशाळेत येताच गोपीचंद गडावरील शेतकरी व सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गायीची पूजा केली. इतर शेतकऱ्यांनी लक्षमन शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी ग्यानबा बोबडे,संभाजी बोबडे आशिष बोबडे ,रामेश्वर बोबडे सह शेतकरी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting