Home जळगाव पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड. अभय पाटील यांची निवड… !

पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड. अभय पाटील यांची निवड… !

153

निखिल मोर

पाचोरा – मा. शिवसेना पक्ष प्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील सो, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्रजी मिर्लेकर साहेब, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना पक्षाची बाजू मांडण्यासाठी, शिवसेना कार्य, ध्येय धोरण, तळागाळातील शिवसैनिक , जनते पर्यंत पोहचण्यासाठी व संघटना मजबुती करणासाठी , पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड. अभय शरद पाटील यांची करण्यात आलेली आहे. तसेच, पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या शिवसेना प्रवक्ते पदी रावसाहेब मनोहर पाटील निपाणे, रमेश बाफना कोल्हे, अरुण रुपचंद पाटील कुऱ्हाड, गणेश परदेशी भडगाव, ऍड.अभय शरद पाटील शिंदाड, गणेश भीमराव पाटील, पाचोरा आदी मान्यवरांचे पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.

या निवडी बद्दल आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, यांनी अभिनंदन केले. तसेच, सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.