Home विदर्भ खंडवा येथील दादाजी धुनिवाले समाधीस्थळ 10 जुलै पर्यंत दर्शनासाठी बंद.

खंडवा येथील दादाजी धुनिवाले समाधीस्थळ 10 जुलै पर्यंत दर्शनासाठी बंद.

157

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

जिल्हयातील भक्तांनी दर्शनासाठी जाऊ नये

वर्धा, दि. १३ :- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील खंडवा प्रशासनाने दादाजी धुनिवाले यांची समाधी असलेले मंदिर भाविकाच्या दर्शनासाठी 10 जुलै पर्यंत बंद केले आहे. जिल्हयातील भाविकांनी खंडवा येथे दर्शनासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.
5 जुलै रोजी गुरु पोर्णिमा असून दरवर्षी गुरुपोर्णिमेच्या दिवशी मध्यप्रदेशातील खंडवा येथे दादाजी धुनिवाले यांची समाधी असलेल्या मंदिरात महाराष्ट्रातील भाविक दर्शनासाठी मोठया प्रमाणात जात असतात. या भाविकामध्ये मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे, जळगाव, अकोला इत्यादी जिल्हयातील 3 ते 4 लाख भाविकांचा समावेश असतो. त्यामुळे खंडवा येथे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी 10 जुलै पर्यंत दादाजी धुनिवाले यांचे मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याचे खंडवाचे जिल्हाधिकारी अनय व्दिवेदी यांनी कळविले आहे. त्यामुळे वर्धा जिल्हयातील दादाजी धुनिवाले यांच्या भक्तांनी खंडवा येथे दर्शनासाठी जाऊन नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.